चालत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार; सोशल मीडियावर झालेल्या मित्राने केले दुष्कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 07:46 PM2021-08-22T19:46:30+5:302021-08-23T20:21:45+5:30

Crime News : गाझियाबादच्या एका महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरात सोडल्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

महिलेने १६ ऑगस्ट रोजी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि तिच्या तक्रारीच्या आधारे दोघांना एकाच दिवशी अटक करण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

गाझियाबाद येथील रहिवासी असलेल्या बलात्कार पीडितेने सोशल मीडियावर आरोपीशी मैत्री केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन आरोपी तिला भेटण्यासाठी एका कारमधून गाझियाबादला पोहोचले होते. बऱ्याच संकोचानंतर तिने कारमध्ये प्रवेश केल्याचे पीडितेने सांगितले.

पीडितेच्या तक्रारीत पीडित महिलेने आरोप केला की, कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने प्रथम तिला मारहाण केली आणि नंतर चालत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला.

नंतर, ड्रायव्हरने दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरात गाडी थांबवली, तिच्यावर बलात्कार केला आणि तिला तिथे सोडले. नंतर दोघेही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिला ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात एफआयआर दाखल केला आणि तपास सुरू केला.

दरम्यान पोलिसांनी जवळच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार पाहिली. यामुळे त्या दोन आरोपींना अटक करण्यात मदत झाली.