एका झटक्यात 15513 रुपयांनी घसरली चांदी, सोन्याच्या किंमतींचीही घसरगुंडी! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:24 IST2026-01-22T14:17:02+5:302026-01-22T14:24:13+5:30
आज या दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काहीसे मवाळ होताच, जागतिक बाजारासह सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या दराची झळाळीही काहीशी कमी झाली आहे. नफावसुलीमुळे आज या दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

बुधवारच्या बंद भावाच्या तुलनेत आज सोने २,७२८ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले. तर चांदीचे दर एका झटक्यात १५५१३ रुपयांची आपटले. या मोठ्या घसरणीनंतरही, चालू वर्षाचा विचार करता, केवळ २२ दिवसांत चांदी ७३१६४ रुपयांनी तर सोने १८३०४ रुपयांनी वधारले आहे.

यानंतर आता, जीएसटीसह चांदी ३१२६९१ रुपये प्रति किलोवर आली आहे. तर २४ कॅरेट सोने जीएसटीसह १५६०४३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे.

आज सकाळच्या सुमारास विना-जीएसटी चांदी ३०३५८४ रुपये प्रति किलो तर सोने १५१४९९ रुपये प्रति १० ग्रॅमवर खुले झाले होते. बुधवारी विना जीएसटी चांदी ३१९०९७ रुपयांवर तर सोने १५४२२७ रुपयांवर बंद झाले होते.

आयबीजेए (IBJA) ने जारी केलेल्या दरानुसार सोन्या-चांदीचे दर - २३ कॅरेट सोने २,७१७ रुपयांनी स्वस्त होऊन १५५४१८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर २२ कॅरेट सोने २४९९ रुपयांनी स्वस्त होऊन १४२९३६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे.

१८ कॅरेट सोने २०४६ रुपयांनी स्वस्त होऊन ११७०३२ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे. तर १४ कॅरेट सोने १५९६ रुपयांच्या घसरणीसह ९१२८५ रुपये प्रति १० ग्रॅम आला आहे.

या दरांमध्ये मेकिंग चार्जचा समावेश नाही. आयबीजेए द्वारे दिवसातून दोनवेळा, म्हणजेच दुपारी १२ आणि सायंकाळी ५ वाजता हे दर जारी केले जातात.

















