Gold Silver Rate : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दरात झाली घसरण, फटाफट चेक करा आजचे रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 12:32 PM2023-04-10T12:32:24+5:302023-04-10T12:49:04+5:30

Gold Silver Rate Today : आज सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तुमच्या शहरात दर काय आहेत जाणून घ्या.

Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसापासून सोनं-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. ६१ हजार रुपयांच्या पार सोन्याचे दर झाले आहेत. आज सोनं-चांदीच्या दरात दिलासा मिळाला आहे.

Gold Silver Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. यामुळे देशातील तरातही घसरण झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव घसरत आहे. एमसीएक्सवर सोन्यात ४०९ रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. सोने ०.६८ टक्क्यांनी घसरून ६०१०२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे.

आज सोन्याचा भाव ५९९५८ रुपये प्रति १० ग्रॅमचा नीचांक आणि वरच्या बाजूने ६०४०२ रुपयांचा उच्चांक दिसत आहे.

सोन्याच्या या किमती त्याच्या जूनच्या फ्युचर्ससाठी आहेत आणि आज कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचा त्या वस्तूंमध्ये समावेश आहे ज्याची खरेदी लाल चिन्हात केली जात आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीची किंमत २३० रुपये ०.३१ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. यामध्ये ७४३४० रुपये किलोच्या पातळीवर आहे.

आज चांदी ७४०५७ रुपये किलोवर आहे. तर वरच्या बाजूने ७४३८० रुपयांपर्यंत पातळी दिसून आली. चांदीच्या या किमती त्याच्या मे फ्युचर्ससाठी आहेत.

आज दिल्लीत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ४३० रुपयांनी स्वस्त होऊन ६०,५८० रुपयांवर आहे. मुंबईत आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ४३० रुपयांनी स्वस्त होऊन ६०,४३० रुपयांवर आला आहे.

आज कोलकातामध्ये १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ४३० रुपयांनी स्वस्त होऊन ६०,५८० रुपयांवर आला आहे. चेन्नईमध्ये आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ४२० रुपयांनी स्वस्त होऊन ६१,१०० रुपयांवर आला आहे.