ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 10:27 AM2024-05-19T10:27:45+5:302024-05-19T10:57:25+5:30

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Devendra Fadnavis and Ajit Pawar were against making Eknath Shinde the Chief Minister says Sanjay Raut | ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा

ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा

Sanjay Raut on Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी महाराष्ट्रात १३ मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही तयार होतो पण त्यांची आपआपसात चर्चा झाली असे शरद पवारांनी म्हटल्यांचे माध्यमांनी म्हटलं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना धक्कादायक खुलासा केला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा विरोध होता असा दावा संजय राऊत यांनी केला.

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांनी उद्धव यांना मुख्यमंत्री केलेच नसते असा दावा केला होता. तर आता दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध होता धक्कादायक खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. भाजपबरोबर आपण राहिलो तर कधीच मुख्यमंत्री होता येणार नाही हे उद्धव यांना माहीत होते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे ठरावीक हस्तकांकरवी त्यांनीच शरद पवारांना तसा निरोप पाठवला. आज ते म्हणतात, मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. हे साफ खोटे आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा होतीच. हेही पुन्हा बाळासाहेबांच्या विचारांशी विसंगत होते. शिवसेनाप्रमुखांना कधीच सत्तेची लालसा नव्हती. त्यांना सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावे असे वाटायचे. शिवसेनाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केले नसते, असा दावा मुख्यमंत्री शिंदेंनी केला  आहे.

एकनाथ शिंदे तेव्हा कोणालाच नको होते - संजय राऊत

"सरकारचे नेतृत्व अशा चेहऱ्याने करावं जे महाविकास आघाडीत नेत्याला मान्य असेल असं मत शरद पवार आणि राहुल गांधी यांचे होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे पहिले सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील होते. आम्ही वरिष्ठ आहोत त्यामुळे कनिष्ठ माणसाच्या हाताखाली काम करणार नाही, ही त्यांची भूमिका होती. २०१९ साली जेव्हा मुख्यमंत्रीपदावरुन भाजप आणि शिवसेनेत वाद सुरु झाला होता तेव्हाही विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली होती. शिवसेनेकडून शिंदे यांचेच नाव पुढे केले गेलं होतं. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला निरोप पाठवला की, दिल्लीचा निर्णय मुख्यमंत्रीपदाबाबत काय येईल ते माहिती नाही. पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत, ही फडणवीसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका होती. शिंदे तेव्हा कोणालाच नको होते. त्यांचा अनुभव कमी होता. शिंदेंच्या कामाची पद्धत पैसा फेको तमाशा देखो अशी असल्याने त्यांनी राज्याचे नेतृत्व करावे अशी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका नव्हती. ही भाजपची भूमिका आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याआधीची होती," असे संजय राऊत यांनी म्हटलं.

Web Title: Devendra Fadnavis and Ajit Pawar were against making Eknath Shinde the Chief Minister says Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.