मोस्ट ब्युटीफुल सनॉन! फोटोंवरून हटणार नाही नजर, इंडस्ट्रीत आहे क्रिती सनॉनची बहिण, पाहिलीत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 05:22 PM2024-05-17T17:22:43+5:302024-05-17T17:34:12+5:30

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री क्रिती सनॉन कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

क्रिती सनॉन सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती नेहमीच तिचे हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये बरीच चर्चा असते.

मात्र तुम्ही कधी तिच्या बहिणीला पाहिलंय का? तिची बहीण दिसायला अभिनेत्री इतकीच सुंदर आहे.

क्रिती सनॉनला एक सख्खी बहीण आहे. तिचं नाव नुपूर आहे.

नुपूर आणि क्रिती या दोन बहिणींमध्ये कमालीचं बॉन्डिंग असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे.

नुपूर सनॉन ही पहिल्यांदा अक्षय कुमारसोबत एका गाण्यात झळकली होती. हे गाणे प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजले आणि नुपूरला खूप दाद मिळाली होती.

नुपूर ही डिस्ने+ हॉटस्टारच्या टेलिव्हिजन मालिका 'पॉप कौन?'मध्ये ती दिसली होती. यानंतर रवी तेजासोबत तेलगू चित्रपटात झळकली होती.

नुपूर सनॉन सोशल मीडियावर आपले मोहक - आकर्षक फोटो व व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामुळेच तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय.

नुपूरचे हे आउटफिट प्रचंड शानदार व फॅशनेबल असतात. ड्रेसच्या रंगापासून ते डिझाइनपर्यंत सारं काही कमालच असतं.

सनॉन बहिणींची बोल्ड आणि क्युट झलक या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. दोघीही फॅशन स्टाइलमुळे लोकांना आकर्षित करताना दिसून येतात.