मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 11:34 AM2024-05-18T11:34:21+5:302024-05-18T11:42:16+5:30

Mukta Barve : मुक्ता बर्वे हिने नुकताच म्हणजे १७ मे रोजी ४५ वा वाढदिवस साजरा केला.

अभिनेत्री मुक्ता बर्वे सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकताच तिचा नाच गं घुमा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात मुक्ताने वर्किंग महिलेची भूमिका साकारली आहे.

नुकताच म्हणजे १७ मे रोजी मुक्ताने ४५ वा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

मुक्ताने वयाची ४५शी गाठली असली तरी ती अद्याप सिंगल आहे. तिने लग्न न करण्याचे कारण समोर आले आहे. याबद्दल तिनेच एका मुलाखतीत सांगितले होते.

अभिनेत्री मुक्ता बर्वेचा जन्म पुण्यात झाला आहे. तिला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिचा आई वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.

मुक्ताची आई लेखिका असून त्यांनी लिहिलेल्या रुसू नका फुगू नका या नाटकात मुक्ताला काम दिले. या बालनाट्यातील 'भित्रा ससा' आणि 'परी राणी' या दोन्ही भूमिका तिने केल्या.

वयाच्या १५व्या वर्षी मुक्ताने रत्नाकर मतकरी यांच्या 'घर तिघांचे हवे' या नाटकात काम केले. त्यानंतर मुक्ताने कधीच मागे वळून पाहिले नाही.

जोगवा चित्रपटातून मुक्ताला खरी ओळख मिळाली. त्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेतील राधाच्या भूमिकेतून ती घराघरात पोहचली.

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेच्या मुंबई पुणे मुंबई चित्रपटालाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.तिने साकारलेली सडेतोड, प्रॅक्टीकल गौरी सगळ्यांनाच आवडली. यातील त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली.

या चित्रपटानंतर मुक्ताचे फॅन फॉलोव्हिंग खूप वाढले. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. अनेकांना तिने अद्याप लग्न का नाही केले, हे जाणून घ्यायचे आहे.

एका मुलाखतीत मुक्ता बर्वेने स्वतःच अद्याप अविवाहित का आहे, यामागचे कारण सांगितले होते.

मुक्ता म्हणाली की, मी आता जेवढी सुखी आणि आनंदी आहे, त्यापेक्षा माझा आनंद आणि सुख वाढणार असेल, तरच मी लग्न करेन.