'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 09:23 AM2024-05-19T09:23:29+5:302024-05-19T09:24:15+5:30

कार्तिक आर्यनच्या बहुचर्चित 'चंदू चँपियन' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी खास भूमिकेत दिसून येतेय (kartik aaryan, hemangi kavi, chandu champion)

chandu champion trailer out starring kartik aaryan hemangi kavi kabir khan | 'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष

'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष

गेल्या अनेक दिवसांपासून कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'ची उत्सुकता शिगेला आहे. कार्तिक आर्यनच्या नव्या सिनेमाचं जबरदस्त पोस्टर चाहत्यांच्या भेटीला आलं. यावेळी कार्तिक आर्यनने केलेलं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच 'चंदू चँपियन'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर भेटीला आलाय. विशेष म्हणजे या ट्रेलरमध्ये मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने लक्ष वेधून घेतलंय.

काल ग्वाल्हेरमध्ये 'चंदू चँपियन'चा ट्रेलर लॉंच झाला. कधीही हार न मानणाऱ्या माणसाचा प्रेरणादायी प्रवास दाखवणारा हा ट्रेलर हृदयस्पर्शी क्षणांनी भरलेला आहे. ट्रेलर प्रेक्षकांना "चंदू चॅम्पियन" च्या कल्पनेपेक्षा मोठ्या जगाची झलक देतो. कार्तिक आर्यन एक सैनिक, बॉक्सर आणि कुस्तीपट अशा विविधाांगी भूमिकेत दिसतो. विशेष म्हणजे अभिनेत्री हेमांगी कवी कार्तिकच्या आईच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

'चंदू चँपियन'मधून जिगरबाज मराठमोळे सैनिक मुरलीकांत पेटकर यांची कहाणी बघायला मिळणार आहे. साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांची सह-निर्मित असलेला 'चंदू चॅम्पियन' 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. ट्रेलर पाहून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय कथा असेल. त्यामुळे आतापासूनच सर्वांना 'चंदू चँपियन' पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

Web Title: chandu champion trailer out starring kartik aaryan hemangi kavi kabir khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.