Cyber Scam Alert: कोरोना काळात Cyber Fraud मध्ये वाढ; कसा कराल बचाव, Airtel नं लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 12:31 PM2021-05-22T12:31:27+5:302021-05-22T12:42:34+5:30

Coronavirus Pandemic Cyber Fraud: कोरोना महासाथीच्या काळात अनेकांनी दिलाय ऑनलाईन पेमेंटवर भर. त्यामुळे फसवणूक होण्याच्या प्रकारातही झालीये वाढ.

कोरोनाची दुसरी लाट अधिक संसर्गजन्य असल्याचे सिद्ध होत आहे. यामुळे, देशातील बहुतेक भागात लॉकडाउन / निर्बंध लादण्यात आले आहेत. सर्वात सोयीची असल्यानं लॉकडाऊन दरम्यान ऑनलाइन पेमेंट वेगाने वाढली आहेत.

यामुळे कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचं भान राखत पेमेंटही करता येतंय. ऑनलाईन व्यवहारात वाढ झाल्यानं सायबर फसवणूकीच्या प्रकारातही झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे.

यासंदर्भात एअरटेलचे (Airtel) मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल यांनी सर्व ग्राहकांना एक पत्र लिहिलं आहे.

पत्र लिहून फसवणूक करणारे ग्राहकांशी कशी फसवणूक करतात हे स्पष्ट केले आणि तसंच यात त्यांनी यापासून आपला बचाव करण्यासाठी असलेल्या कंपनीच्या फीचरच्या बाबतीही माहिती दिली.

सर्वात सामान्य म्हणजे बहुतेक फसवणूक करणारे एअरटेलचे कर्मचारी म्हणून कॉल करतात आणि अपूर्ण केवायसीचा हवाला देत ते Google Play Store मध्ये जाऊन एअरटेल क्विक सपोर्ट Airtel Quick Support डाऊनलोड करण्यास सांगतात.

जेणेकरून याच्या सहाय्यानं ग्राहकांची मदत करता येईल. दरम्यान, गोपाल विठ्ठल यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहक जेव्हा हे अॅप इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना TeamViewer Quick Support अॅपकडे रिडायरेक्ट केलं जातं.

यामध्ये ग्राहकांच्या डिव्हाईसवर आणि त्याच्याशी निगडीत खात्यावर फसवणूक करणाऱ्याचं नियंत्रण असतं. अशा फसवणुकीबद्दल त्वरित १२१ वर कॉल करून संपर्क साधण्याचं आवाहन एअरटेलनं केलं आहे.

फसवणूक करणारे एअरटेलचे कर्मचारी बनून कॉल किंवा एसएमएस करत मोठी सूट देत व्हीआयपी क्रमांक देण्याचं आश्वासन देतात.

यासाठी ग्राहकांना टोन किंवा बुकिंग अमाऊंटची रिक्वेस्ट केली जाते. ही रक्कम मिळाल्यानंतर लोकं ग्राहकासोबत संपर्क बंद करतात. तसंच त्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचणं अशक्य होतं. अशावेळी याची माहिती १२१ या क्रमांकावर कॉल करून देण्याचं आवाहनही एअरटेलनं केलं आहे.

सध्या डिजिटल पेमेंट्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सायबर क्राईमही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी एअरटेलनं इंडस्ट्री फर्स्ट फीचरच्या रूपात Safe Pay लाँच केलं आहे. कंपनीनं हे अतिशय सुरक्षित टूल असल्याचा दावा केला आहे.

फसवणूक करणारी व्यक्ती कोणती बँक अथवा आर्थिक संस्थांशी निगडीत असल्याचं सांगतात. तसंच खात्याची माहिती किंवा अनब्लॉक आणि रिन्यू करण्यासाठी ओटीपी विचारतात. याचा वापर ग्राहकांच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी केला जातो.

अनेकदा फसवणूक करणारे ग्राहकांना कॉल करून वेबसाईटवरून सेकंड हँड लिस्टेड प्रोडक्ट्स खरेदी करण्याचा बहाणा करतात.

किंमतीबाबत बोलताना ते ग्राहकांकडून युपीआय डिटेल्सही मागतात. जेणेकरून ग्राहकांना पैसे पाठवले जावे. जेव्हा ग्राहक त्यांना ती माहिती देतात तेव्हा एक एसएमएस अप्रुव्हलसाठी पाठवला जातो. त्यावेळी ग्राहकांच्या खात्यात पैसे येण्याऐवजी ते कापले जातात.

तसंच प्रत्येक ट्रान्झॅक्शनला हे अतिरिक्त सिक्युरिटी लेव्हल देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जेव्हा तुम्ही कोणतंही पेमेंट करता त्यावेळी कंपनीचं नेटवर्क इंटेलिजन्स एक मेसेज पाठवून खात्री करून घेतं.

तसंच सेफ पे च्या वापरासाठी एअरटेल पेमेंट्स बँक अकाऊंट असणं आवश्यक आहे. या खात्यात ग्राहकांना जास्तीतजास्त २ लाख रूपये ठेवण्याची मुभा आहे. तसंच १-२ लाख रूपयांच्या रकमेवर ६ टक्के व्याजही देण्यात येतं.