निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 06:24 PM2024-06-16T18:24:00+5:302024-06-16T19:11:54+5:30

Alia Bhatt Yellow Floral Cute Look: क्यूट ड्रेस घातलेल्या आलियाची नवी हेअरस्टाइल तिचे सौंदर्य अधिकच खुलवत होती.

Alia Bhatt Cute Look: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आज एका कार्यक्रमात दिसली. या कार्यक्रमासाठी आलियाने पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड ड्रेस घातला. त्यात ती खूपच क्यूट आणि निरागस दिसली.

आलियाच्या नव्या हेअरस्टाइलने तिच्या सौंदर्यात भर घातली. या लेटेस्ट लूकमध्ये अलिया अतिशय सालस आणि गोंडस दिसली.

आलिया ही एक उत्तम बिझनेसवूमनही आहे. तिचा क्लोदिंग ब्रँड 'एड-ए-मम्मा' खूप लोकप्रिय आहे. आलिया तिच्या कपड्यांच्या ब्रँडच्या लेटेस्ट एडिशनच्या कार्यक्रमासाठी आली.

अतिशय गोंडस आणि क्यूट लूकमध्ये ती कार्यक्रमात पोहोचली आणि तिने सर्वांची मनं जिंकली. या कार्यक्रमात तिल्या फिकट पिवळ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंटेड ड्रेसने ती सर्वांच्यात विशेष उठून दिसली.

आलियाचा हा पिवळा स्ट्रॅपी वन पीस तिच्यावर खूपच क्यूट दिसला. लहान मुलीने फ्रॉक घालून छान गोंडस दिसावं अशी आलिया या फ्रॉक स्टाईल वन पीस मध्ये दिसली.

आलियाने ड्रेससोबत फार मेकअप न करता सिंपल लूक ठेवला. अलियाच्या नव्या छोट्या केसांच्या स्टाईलमुळे ती अधिकच चर्चेत राहिली.

आलियाने या ड्रेससोबत पांढऱ्या रंगाची हील्स घातली होती. तसेच आलियाने या फ्लोरल ड्रेससोबत कोणतीही ऍक्सेसरी घातली नव्हती.

या कार्यक्रमादरम्यान आलिया भट्टने तिच्या निरागस हास्याने सर्वांची मने जिंकली. आलियाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

आलियाच्या या नव्या कोऱ्या लूकबद्दल चाहत्यांकडून तिची वाहवा होत आहेच, पण सोशल मीडियावरही तिची चर्चा आहे.