शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani यांच्या 'या' कंपनीचा येणार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 9:33 AM

1 / 10
Adani Wilmar IPO: गौतम अदानी यांची आणखी एक कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. सध्या अदानी समूहाच्या सहा कंपन्या बाजारात सूचीबद्ध आहेत.
2 / 10
CNBC TV18 च्या वृत्तानुसार, अदानी विल्मरचा IPO ४५०० कोटी रूपयांचा असू शकतो. कंपनीचे मूल्यांकन ३,७५०० ते ४,५००० कोटी रूपयांदरम्यान असू शकते. कंपनी १० ते २० टक्के भागभांडवल जारी करू शकते, असं मानलं जात आहे.
3 / 10
या कंपनीमध्ये Adani Enterprises चा ५० टक्के हिस्सा आहे. त्या हिशोबानं अदानी विल्मरमध्ये अदानी एन्टरप्राईजेसच्या हिस्स्याचं मूल्यांकन १८,७५० ते २२,५०० कोटी रूपये असू शकतं. अदानी विल्मरचा आयपीओ एक फ्रेश इश्यू असेल.
4 / 10
जेपी मॉर्गन, कोटक महिंद्रा कॅपिटल आणि आयसीआयसीआय सिक्योरिटीजना बँकर्स म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. अदानी विल्मर अदानी एन्टरप्राईजेस आणि विल्मर इंटरनॅशनलचं एक जॉईंट व्हेन्चर आहे. यामध्ये दोन्ही समुहांची ५०-५० टक्के भागीदारी आहे.
5 / 10
फूड कंपनीबाबत Adani Wilmar ची मोठी योजना आहे. या योजनेनुसार Adani Wilmar २०१७ पर्यंत भारतातील सर्वात मोठी फूड कंपनी बनेल. Adani Wilmar द्वारे गौतम अदानी हे बाबा रामदेव यांच्या Ruchi Soya या कंपनीला टक्कर देतील.
6 / 10
Adani Wilmar चे एडिबल ऑईलमध्ये अनेक प्रोडक्ट्स आहेत. Fortune Oil हा त्यापैकीच एक प्रोडक्ट आहे. याशिवाय कंपनी तांदूळ, सोयाबिन, बेसन, डाळ, साबण, साखर यांशिवाय अनेक प्रोडक्ट तयार करतात. कंपनीचे अनेक प्रोडक्ट Fortune या नावानं येतात.
7 / 10
Adani Wilmar चा Fortune हा सर्वात लोकप्रिय प्रोडक्ट आहे. या कंपनीची स्थापना अदानी समूह आणि सिंगापूरमधील Wilmar कंपनीसोबत जॉईंट व्हेन्चरमध्ये १९९९ मध्ये झाली होती. अॅग्री बिझनेस हा त्यांना मुख्य व्यवसाय आहे.
8 / 10
Adani Wilmar नं आपल्या बेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार एडिबल ऑईल मार्केटमध्ये आपल्या देशातील सर्वात मोठं डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आहे. संपूर्ण देशात त्यांचे ८५ स्टॉक पॉईंट आणि ५०० डिस्ट्रीब्यूटर्स आहेत.
9 / 10
रिटेल मार्केटमध्ये त्यांचा हिस्सा जवळपास १० टक्के आहे. संपूर्ण देशात जवळपास १५ लाख रिटेल आऊटलेटवर त्यांचे प्रोडक्ट उपलब्ध असतात.
10 / 10
आरोग्याकड़े लक्ष देत कंपनीनं स्पेशल ऑईल Rice Bran and Vivo लाँच केलं आहे. तर कंपनीचं अन्य एक एडिबल ऑईल ब्रांड Rupchanda बांगलादेशमध्ये मार्केट लीडर आहे. तर याव्यतिरिक्त कंपनीच्या दोन मोठ्या रिफायनरीदेखील आहेत.
टॅग्स :AdaniअदानीIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगInvestmentगुंतवणूकMONEYपैसाIndiaभारतBaba Ramdevरामदेव बाबा