Solar Eclipse 2022: यंदाचे पहिले सूर्यग्रहण: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना लाभच लाभ; सुख, समृद्धीचा उत्तम काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 01:16 PM2022-04-29T13:16:32+5:302022-04-29T13:20:35+5:30

Solar Eclipse 2022: १०० वर्षांनंतर सन २०२२ च्या पहिल्या सूर्यग्रहणाला अद्भूत योग जुळून येत असून, त्याचा लाभ नेमक्या कोणत्या राशींना होणार? जाणून घ्या...

वास्तविक पाहता ग्रहण ही वैज्ञानिक घटना आहे. मात्र, ज्योतिषीय दृष्टिकोनातून ग्रहण विशेष मानले जाते. एखाद्या ग्रहणाचे पडसाद राशींसह जगावर पडत असतात, अशी मान्यता आहे. संपूर्ण एप्रिल महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचा मानला गेला. (Solar Eclipse April 2022)

सन २०२२ मधील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी आहे. हे सूर्यग्रहण मेष राशीत होणार असून, या दिवशी शनी अमावास्याही आहे. हा योगायोग जवळपास १०० वर्षांनी घडला आहे. त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिने याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. (Solar Eclipse April 2022 Astrology)

शनिवार, ३० एप्रिल रोजी असणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे यासाठीचा सूतक काळ आणि अन्य बंधने पाळण्याची गरज नाही. नित्यनेमाचे धार्मिक विधी, इतर कार्ये केली जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. पहिल्या सूर्यग्रहणाचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा मिळेल, ते जाणून घेऊया...

सूर्यग्रहणाचा मिथुन राशीच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. एखादे नवीन काम सुरू करण्याची योजना आखू शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. नोकरदार वर्गाच्या उत्पन्नातही वाढ होण्याचे संकेत आहेत. मिथुन राशीचा स्वामी बुध असून, बुध ग्रहाचा सूर्य ग्रहाशी मैत्रीचा भाव आहे. त्यामुळे हे ग्रहण या राशीच्या व्यक्तींना शुभ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

सूर्यग्रहण कर्क राशीच्या व्यक्तींसाठी चांगले ठरू शकेल. आगामी कालावधीत आईकडून सुख, समाधान प्राप्त होऊ शकेल. वाहन खरेदीची इच्छा पूर्णत्वास जाऊ शकेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकेल. अचानक धनलाभ होऊ शकेल. सासरच्या मंडळींमुळे फायदा होऊ शकेल. मान-सन्मान वाढेल. मात्र, आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

सूर्यग्रहण वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकेल. आगामी कालावधीत जुन्या गुंतवणुकीचा चांगला फायदा होऊ शकेल. त्यातून लाभ मिळू शकेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. विरोधकांवर विजय प्राप्त करू शकाल. आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतील. अत्यंत सावधगिरी बाळगून प्रवास करण्याचा सल्ला दिला जात आहे.

सूर्यग्रहण धनु राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकेल. या काळात व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. यश, प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतील. जुनी येणी वसूल होऊ शकतात. नोकरदारांना रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होऊ शकतील.

सूर्यग्रहण कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकेल. आगामी कालावधीत जोखीम पत्करून कार्य तडीस नेऊ शकाल. व्यवसाय, व्यापारात प्रगती होऊ शकेल. आपल्या योजना फायदेशीर ठरू शकतील. या कालावधीत भाग्य आणि नशीबासह जोडीदाराची उत्तम साथ लाभू शकेल. लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील.

पहिले सूर्यग्रहण खंडग्रास स्वरुपाचे आहे. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. थोडक्यात ज्या सूर्यग्रहणात चंद्र हा सूर्याला पूर्णपणे व्यापू शकत नाही त्या सूर्यग्रहणाला खंडग्रास म्हणतात.