नोव्हेंबर लकी ठरणार! ‘या’ ९ राशींना धनलाभाचे प्रबळ योग; महिनाभर यश, प्रगतीचा समृद्ध काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 08:18 AM2022-11-01T08:18:51+5:302022-11-01T08:27:04+5:30

करिअर आणि आर्थिक आघाडीवर नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतील? जाणून घ्या...

पाहता पाहता सन २०२२ वर्ष सरत चालले असून, नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. धार्मिक, सांस्कृतिक अन् ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून हा महिना अतिशय उत्तम मानला जात आहे. या महिन्यात ४ ग्रह राशीपरिवर्तन करणार असून, एक ग्रह चलनबदल करणार आहे. (november 2022 money career horoscope)

नवग्रहांचा राजा सूर्य, नवग्रहांचा राजकुमार बुध, नवग्रहांचा सेनापती मंगळ, शुक्र राशीपरिवर्तन करणार असून, नवग्रहांचा गुरु बृहस्पति चलनबदल करणार आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा काही राशीच्या व्यक्तींना लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

नोव्हेंबर महिन्यातील एकूण ग्रहस्थितीचा, राशी परिवर्तनाचा तसेच चलनबदलाचा करिअर आणि आर्थिक आघाडीवर नोव्हेंबर महिना कोणत्या राशीच्या व्यक्तींना अतिशय शुभ-लाभदायक आणि लकी ठरू शकेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घेणे उपयुक्त ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना आर्थिक आणि करिअरदृष्ट्या अनुकूल ठरू शकेल. कार्यक्षेत्रात चिंतामुक्तीचे वातावरण असू शकेल. यामुळे चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतील. या महिन्यात तुमच्या आर्थिक आघाडीवर सुधारणा दिसून येऊ शकेल. आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होईल. शांतता आणि समृद्ध जीवनाचा अनुभव घेऊ शकाल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना आर्थिक आघाडी आणि करिअरदृष्ट्या यशकारक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. तसेच या महिन्यात तुमच्यासाठी अनेक शुभ योगायोग घडतील. प्रवास तुमच्यासाठी शुभ परिणाम देतील. आर्थिक आघाडीवर आर्थिक लाभाची परिस्थिती असेल. तुम्ही जितके अधिक लक्ष देऊन निर्णय घ्याल तितके जास्त पैसे मिळू शकतील.

मिथुन राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना आर्थिक आघाडी आणि करिअरदृष्ट्या संमिश्र ठरू शकेल. प्रवासात शुभ परिणाम मिळतील. आर्थिक बाबतीत थोडी जोखीम घ्यावी लागेल. या महिन्यात कामाच्या ठिकाणी काही समस्या वाढू शकतात. नोव्हेंबरच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचा फायदा मिळू शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना आर्थिक आघाडी आणि करिअरदृष्ट्या सकारात्मक ठरू शकेल. आर्थिक दृष्टीकोनातून महिना खूप अनुकूल असणार आहे. या महिन्यात तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतील. कामाच्या ठिकाणी काही समस्या वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन सुरुवात किंवा एखादा नवीन प्रकल्प या महिन्यात तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. नोव्हेंबरच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचा फायदा मिळेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना आर्थिक आघाडी आणि करिअरदृष्ट्या अनुकूल ठरू शकेल. या महिन्यात होणारे बदल सकारात्मक ठरू शकतील. आगामी काळात चांगले आर्थिक लाभ देखील होऊ शकतात. कार्यक्षेत्रात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना आर्थिक आघाडी आणि करिअरदृष्ट्या चांगला ठरू शकेल. या महिन्यात कामाच्या ठिकाणी यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. केलेल्या कामाचे समाधान मिळू शकेल. आर्थिक प्रगतीच्या शुभ संधीही या महिन्यात प्राप्त होऊ शकतील. आर्थिक लाभही होतील. प्रवास लाभदायक ठरू शकतील.

तूळ राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना आर्थिक आघाडी आणि करिअरदृष्ट्या अनुकूल ठरू शकेल. लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील तसेच महिनाभर तुमच्या संपत्तीच्या वाढीचे शुभ संयोग घडतील. कामाच्या ठिकाणी वादविवाद, संघर्ष टाळावा, अन्यथा तुम्हालाच त्याचा त्रास होऊ शकेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना आर्थिक आघाडी आणि करिअरदृष्ट्या शुभ ठरू शकेल. आगामी काळात धनलाभाचे प्रबळ योग जुळून येऊ शकतील. मात्र, वेळेप्रसंगी जाणकारांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. कार्यक्षेत्रात हळूहळू यश आणि प्रगतीचे मार्ग दिसू शकतील. महिन्याच्या शेवटी अपेक्षित परिणामांजवळ जाऊ शकाल.

धनु राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना आर्थिक आघाडी आणि करिअरदृष्ट्या अनुकूल ठरू शकेल. या महिन्यात कार्यक्षेत्रात प्रगती होईल. तुमचा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची मदत मोलाची ठरू शकते. आर्थिक लाभाचे प्रबळ योग जुळून येऊ शकतील. तुम्ही तुमच्या भविष्याबाबत नियोजनबद्ध योजना आखू शकाल.

मकर राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना आर्थिक आघाडी आणि करिअरदृष्ट्या सकारात्मक ठरू शकेल. या महिन्यात तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये चांगले परिणाम मिळतील. तसेच अधिक प्रगतीसाठी वाव राहील. हा महिना संयमाने पुढे जाण्याचा महिना आहे. तुम्ही तुमच्या युक्तीने, बुद्धिकौशल्याने बरेच काही साध्य करू शकाल. मात्र, या महिन्यात मुलांशी संबंधित खर्च जास्त होऊ शकतो.

कुंभ राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना आर्थिक आघाडी आणि करिअरदृष्ट्या आनंददायी ठरू शकेल. या महिन्यात कार्यक्षेत्रात प्रगती होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शुभवार्ता मिळू शकेल. तुमच्या करिअरसाठी हा महिना शुभ आहे. आर्थिक बाबतीत एखाद्या महिलेसाठी जास्त खर्च होऊ शकतो.

मीन राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना आर्थिक आघाडीवर संमिश्र तर करिअरदृष्ट्या उत्तम ठरू शकेल. कामाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला आहे. या महिन्यात तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि तुमच्या इच्छेनुसार बदल दिसून येतील. खर्च वाढू शकतील. वृद्ध व्यक्तीवर जास्त खर्च होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.