या वर्षातले शेवटचे दोन महिने सात राशींसाठी ठरणार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायात होणार भरभराट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 08:10 AM2021-11-09T08:10:00+5:302021-11-09T08:10:01+5:30

दिवाळी संपते ना संपते तोच वर्षपूर्तीचे वेध लागतात. वर्षभराचे सिंहावलोकन करताना वर्षभरात काय घडले, काय राहून गेले याचा लेखाजोखा मांडला जातो. एवढेच नाही तर आगामी वर्षात काय करायचे याची तयारी सुरू होते. या सगळ्या गोष्टी सर्व राशीच्या लोकांना लागू होत असल्या तरी ज्योतिष शास्त्राने बारा पैकी सात राशींना दिलासा दिला आहे की त्यांनी योग्य रीतीने प्रयत्न केले तर त्यांची आर्थिक स्थिती उंचावणार आहे तसेच ती आगामी वर्षाची सुखावह नांदी ठरू शकेल. पाहूया त्या सात राशी कोणत्या...

ग्रहाच्या संक्रमणानुसार तुम्हाला प्रवास सुख आणि कौटुंबिक सुख मिळेल. या महिन्यात बृहस्पति तुमच्या कुंडलीच्या अकराव्या घरात प्रवेश करेल, त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढतील. दोन्ही महिने तुमच्यासाठी चांगले आहेत.

कर्क राशीसाठी, बुध बाराव्या आणि तिसऱ्या घराचा स्वामी असेल आणि त्याचे संक्रमण संमिश्र परिणाम देईल. तथापि, तुमच्या राशीसाठी, सूर्य हा दुसऱ्या घराचा स्वामी असेल आणि पाचव्या भागात प्रवेश करेल. मग इथे जर बुधादित्य योग तयार झाला तर तो संपत्तीसाठी चांगला मानला जातो. २० नोव्हेंबरच्या संक्रमणानुसार गुरु आठव्या भागात प्रवेश करेल. गुरू बाराव्या घरात भाग्येश असल्यामुळे भाग्य तुमच्या सोबत नसेल पण हा काळ चांगला राहील.

ग्रहाच्या संक्रमणानुसार तुमची व्यवसायाची बाजू मजबूत असेल. कौटुंबिक सुख-शांती वाढेल. सुख-समृद्धी आणखी वाढेल. २० नोव्हेंबर रोजी गुरु ग्रहाच्या संक्रमणामुळे परिस्थितीत शुभ बदल होतील.

ग्रहाच्या संक्रमणानुसार कुटुंबात आनंद आणि प्रवासाचे योग तयार होतील. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल. 20 नोव्हेंबर रोजी जेव्हा गुरु सहाव्या भावात प्रवेश करेल तेव्हा आरोग्य आणि नातेसंबंधांची काळजी घ्यावी लागेल.

ग्रहाच्या संक्रमणानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. 20 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीत गुरूचे आगमन कुटुंबात आनंद वाढवेल. दुसऱ्या घरात गुरुचे संक्रमण कुटुंब आणि आर्थिक दृष्टीने शुभ आहे. हे संक्रमण तुमच्यासाठी चांगले असेल.

मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ फलदायी असणार आहे. २० नोव्हेंबरनंतर जेव्हा गुरू कुंभ राशीत असेल तेव्हा तुम्हाला थोडे सावध राहावे लागेल. मात्र, दोन्ही महिने तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

तुमचे व्यावसायिक साम्राज्य निर्माण करण्यासाठी ग्रहांचे संक्रमण तुमच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत. 20 नोव्हेंबरनंतर आरोग्यातही सुधारणा होईल आणि आर्थिक स्थितीत बदल होईल.

तूळ आणि वृश्चिक राशीसाठी वर्षाचे शेवटचे 2 महिने चांगले राहतील असे म्हणता येईल. नोव्हेंबर नंतर तूळ राशीला नशिबाची साथ मिळेल व वृश्चिक राशीला कौटुंबिक सुख मिळेल.

Read in English