Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 08:18 PM2024-06-15T20:18:53+5:302024-06-15T20:19:18+5:30

Raju Shetty : लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा यावेळी मोठा मताधिक्क्याने पराभव झाला. दरम्यान, आता शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे.

Mahavikas Aghadi leaders cheated me accusation of Raju Shetty | Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Raju Shetty ( Marathi News ) : लोकसभा निवडणुका संपल्या. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला समोरे जावे लागले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मविआ आधी स्वाभीमानी शेतकरी संघटनेला सोडणार अशा चर्चा सुरू होत्या, पण शेवटच्या क्षणी या मतदारसंघात ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा माजी खासदार राजू शेट्टी यांना पराभवला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, आता राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 

विरोधक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत; लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार?
 
आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शक्तिपीठ महामार्ग आणि लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. राजू शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाची सध्या आवश्यक्ता नाही.  गोवा, नांदेड, लातूर या सगळीकडे जाण्यासाठी महामार्ग आहे. आता पुन्हा त्याच दिशेला जाण्यासाठी नव्या महामार्गाची गरज नाही. आता आहे त्याच टोल नाक्यांना अपेक्षित पैसे मिळत नाहीत, यावरुन असं लक्षात येतं काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना शक्तिपीठच्या माध्यमातून अमाप पैसा गोळा करायचा आहे, जसा समृद्धी महामार्गातून मिळवला, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. 

'यातून अनेकांची समृद्धी केली आणि आमदार खासदारांच्या खरेदीचा भाव वधारला. आता नेमकी कशाची खरेदी करायची आहे कुणाला आर्थिक शक्ती द्यायची आहे, असा सवालही राजू शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांचा या मार्गाला विरोध आहे, बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा मार्ग होऊ द्यायचा नाही असा निर्धार केला आहे, असंही शेट्टी म्हणाले. 

राजू शेट्टींचा गंभीर आरोप 

"लोकसभा निवडणुकीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, खरंतर पाठिंबा दिल्यानंतर नेमकं निवडणून आल्यानंतर काय भूमिका घेणार याबाबत ड्राफ्ट तयार केला होता. तो ड्राफ्ट जयंत पाटील, बंटी पाटील यांनी  तयार केला होता. पण, नंतर त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला. सहा महिन्यापासून ते आम्ही ही जागा सोडली असं सांगत होते. त्यांना वाटत होतं मी उमेदवार आहे त्यांच्या नेत्यांना भेटायला हवं. मी तसे सगळ्यांना भेटलो होतो. पण शेवटी या नेत्यांनी जे करायचं होतं तेच केलं, असा आरोपही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. 

Web Title: Mahavikas Aghadi leaders cheated me accusation of Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.