उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, २३ प्रवासी असलेली टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 03:16 PM2024-06-15T15:16:16+5:302024-06-15T15:23:08+5:30

Uttarakhand accident : बद्रीनाथ महामार्गावरील रेंटोलीजवळ हा अपघात झाला.

rudraprayag accident vehicle carrying 23 passengers fell into alaknanda river many people reported dead, uttarakhand | उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, २३ प्रवासी असलेली टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, २३ प्रवासी असलेली टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. टेम्पो ट्रॅव्हलरचा ताबा सुटून उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत पडली. या अपघातात १० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बद्रीनाथ महामार्गावरील रेंटोलीजवळ हा अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलरचा ताबा सुटून उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत पडली. या अपघातात दहा पर्यटकांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये २३ प्रवासी असल्याची माहिती आहे. सर्वजण बद्रीनाथ दर्शनासाठी जात होते. हे पर्यटक दिल्लीतील असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीमही घटनास्थळी रवाना झाली. एमआरएफ आणि एनडीआरपीची टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू झाले आहे.तसेच, स्थानिक लोक पोलिसांना मदत करत आहेत. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. गंभीर जखमींना हेलिकॉप्टरने ऋषिकेश एम्समध्ये पाठवण्यात येत आहे. एसपी डॉ. विशाखा अशोक भदाणे यांनी सांगितले की, स्थानिक लोक, एसडीआरएफ, अग्निशमन सेवा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जल पोलीस बचावकार्य करत आहेत.

या अपघातावर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्यक्त केले दु:ख 
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. पुष्कर सिंह धामी यांनी एक्सवर लिहिले की, "रुद्रप्रयाग जिल्ह्यात टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघाताची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचावकार्य सुरु केले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दिवंगतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी बाबा केदार यांना प्रार्थना करतो."

Web Title: rudraprayag accident vehicle carrying 23 passengers fell into alaknanda river many people reported dead, uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.