अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 12:05 AM2024-06-16T00:05:14+5:302024-06-16T00:06:50+5:30

जखमींवर एम्स ऋषिकेशमध्ये उपचार सुरू आहेत.

Mini bus falls 660 feet in Alaknanda; 14 dead in Rudraprayag accident, inquiry ordered | अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश

अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात शनिवारी बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरून मिनी बसचा मोठा अपघात झाला. या अपघातात २६ प्रवासी होते. ही मिनी बस रस्त्यावरून घसरली आणि सुमारे ६६० फूट खाली अलकनंदा नदीत पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून जखमींना एअरलिफ्ट करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. चालक घाबरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

बसमधील २६ प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी झोपले असल्याचे बोलले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीहून चोपटा-तुंगनाथ-चंद्रशिला ट्रेकिंगसाठी २६ प्रवाशांचा ग्रुप निघाला होता. बद्रीनाथ महामार्गावर चालकाला झोप लागल्याने सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Mini bus falls 660 feet in Alaknanda; 14 dead in Rudraprayag accident, inquiry ordered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात