धनु संक्रांती: सूर्य गोचराचा ‘या’ ६ राशींना भरघोस फायदा; भाग्योदयासह यश, प्रगतीचा तेजोमय काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 02:58 PM2022-12-08T14:58:43+5:302022-12-08T15:04:06+5:30

सूर्य आणि गुरु मित्र ग्रह मानले जात असून, धनु संक्रांती अनेक राशींना लाभाची ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

नवग्रहांचा राजा सूर्य वृश्चिक राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत प्रवेश करणार आहे. प्रत्येक महिन्याला सूर्याचे राशीसंक्रमण होत असते. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांत म्हटले जाते. सूर्याचा धनु प्रवेश होत असल्याने याला धनु संक्रांत असे संबोधले जाते.

१६ डिसेंबर २०२२ रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. याला धनुर्मासारंभ असेही म्हटले जाते. काही मान्यतांनुसार, या धनुर्मासात शुभ कार्ये केली जात नाहीत. धनु राशीत सूर्य प्रवेशाने मेष राशीसह ६ राशींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात शुभ परिणाम प्राप्त होतील, असे म्हटले जात आहे.

सूर्याचा धनु राशीतील प्रवेशाने काही शुभ योगही जुळून येतील, असे म्हटले जात आहे. गुरु आणि सूर्य एकमेकांचे मित्र ग्रह मानले जातात. यामुळे धनु राशीतील सूर्याचे संक्रमण कोणत्या राशींना शुभ-लाभदायक ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती शुभ ठरू शकेल. विद्यार्थी वर्गाला चांगल्या संधी मिळू शकतात. परदेशातील कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर त्यांची योजना यशस्वी होऊ शकते. जे प्रेमसंबंधात आहेत त्यांचे लग्न होण्याची शक्यता आहे. तुमची आवड धार्मिक कार्यात अधिक राहील.

कन्या राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती फलदायी ठरू शकेल. हे संक्रमण तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी खूप फलदायी ठरेल. जे आयात-निर्यात संबंधित काम करतात, त्यांना या काळात भरपूर नफा मिळू शकतो. नोकरदार वर्गाला आगामी काळ खूप चांगला ठरू शकेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती अनुकूल ठरू शकेल. बोलण्यात अधिक माधुर्य दिसून येईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी कराल. जे सरकारी नोकरी करतात त्यांना या काळात बदलीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.

धनु राशीत सूर्याचा प्रवेश होत आहे. आताच्या घडीला शुक्र आणि बुध या राशीत विराजमान आहेत. यातच सूर्याच्या प्रवेशाचा या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल. नशीबाची उत्तम साथ मिळेल. मान, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकेल. तुमची बढती होण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते.

कुंभ राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती लाभदायक ठरू शकेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आगामी काळ व्यावसायिकदृष्ट्या खूप फलदायी ठरू शकेल. केलेल्या कष्टाचे फळ आर्थिक लाभाच्या रूपात मिळू शकेल. भागीदारीत काम करणाऱ्यांना चांगले यश मिळू शकते.

मीन राशीच्या व्यक्तींना धनु संक्रांती शुभ फलदायी ठरू शकेल. नवीन संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना अधिकृत पदांवर काम करण्याची चांगली संधी मिळू शकते. सरकारी आणि उच्चपदस्थांकडून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.