१ महिना बुधादित्य योग: ‘या’ ५ राशींना सर्वोत्तम लाभ, उत्पन्नात वाढ; कसा असेल शुभ प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 07:07 AM2023-04-14T07:07:07+5:302023-04-14T07:07:07+5:30

बुधादित्य योग अतिशय शुभ मानला गेला असून, सुमारे महिनाभर हा योग मेष राशीत राहणार आहे. कोणत्या राशींना मिळेल लाभ? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजा सूर्य १४ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करत आहे. मेष ही सूर्याची उच्च रास मानली जाते. म्हणजेच या राशीत सूर्य सर्वोत्तम फले देऊ शकतो. आताच्या घडीला बुध आणि राहु मेष राशीत विराजमान आहे. सूर्याच्या मेष राशीतील प्रवेशानंतर सूर्य आणि बुधाचा शुभ बुधादित्य योग जुळून येत आहे.

बुधादित्य योग अतिशय शुभ मानला गेला आहे. सुमारे महिनाभर हा योग सुरू राहणार आहे. त्यामुळे या योगाचा शुभ प्रभाव महिनाभर राहू शकतो, असे म्हटले जात आहे. मात्र, या काळात बुध सुरुवातीला वक्री आणि मग अस्तंगत होणार आहे. मे महिन्यात बुधाचा उदय होऊन बुध मार्गी होणार आहे.

ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग हा अतिशय शुभ योग मानला जातो. करिअर आणि आर्थिक आघाडीच्या दृष्टीने हा योग खूप प्रभावी मानला जात आहे. मेष राशीत तयार झालेल्या बुधादित्य योगाच्या शुभ प्रभावामुळे ५ राशींना पुढील महिनाभरात करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया...

मेष राशीत सूर्य आणि बुधाचा बुधादित्य योग जुळून येत आहे. या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. आत्मविश्वास वाढू शकेल. ऊर्जावान वाटू शकेल. आपली बुद्धी आणि ताकद योग्य दिशेला लावली तर यश मिळू शकेल. करिअरच्या बाबतीत घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकेल. यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. नोकरदार लोकांना चांगल्या संधी मिळू शकतील. बिझनेसमध्ये नफा कमावणे शक्य होऊ शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग धनवृद्धीच्या दृष्टीने खूप शुभ ठरू शकेल. आनंदी आणि समाधानी राहू शकाल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकेल. ऑफिसमध्ये मेहनतीचे फळ मिळेल. नवीन व्यवसायही सुरू करू शकता. ऑफिसमध्ये कार्यक्षमता पाहून महत्त्वाची भूमिका दिली जाऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतील. अनेक मार्गांनी पैसे कमावू शकाल.

कर्क राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग लाभदायक ठरू शकेल. करिअर, आर्थिक आघाडीवर लाभ मिळण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. बरेच दिवस अडकलेले पेमेंट मिळू शकते. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर संधी मिळू शकेल. वरिष्ठ अधिकारी पुढे जाण्यास मदत करू शकतील. उत्पन्न वाढू शकेल. कार्यक्षेत्राचा विस्तार होऊ शकेल. पैशांची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. जोडीदारासोबत नाते मजबूत होऊ शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग फायदेशीर ठरू शकेल. पैसा आणि करिअरच्या दृष्टीने फायदेशीर होऊ शकेल. करिअरमध्ये लाभासोबतच आर्थिक बाबतीतही यश मिळू शकते. धार्मिक कार्याकडे कल वाढू शकेल. देवावर श्रद्धा निर्माण होऊ शकेल. व्यवसाय पुढे नेण्याची संधी मिळेल. नवीन भागीदारीचा लाभ मिळू शकतो. मन प्रसन्न राहील. करिअरमध्ये बदलीच्या संधी मिळू शकतात. जे तुमच्यासाठी योग्य ठरू शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योगाचा काळ अनुकूल ठरू शकेल. करिअरशी संबंधित बाबींमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. ऑफिसमध्ये कामावर मेहनत घेऊ शकाल. त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतील. व्यावसायिकांसाठी नवी डील यशस्वी ठरू शकेल. उधार दिलेली मोठी रक्कम परत मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारू शकेल. आनंद मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल.

सूर्याच्या मेष प्रवेशानंतर केवळ बुधादित्य योग नाही, तर सूर्य, बुध आणि राहु यांचा त्रिग्रही योगही जुळून येत आहे. याशिवाय गुरुच्या प्रवेशानंतर चतुर्ग्रही योग जुळून येऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.