CNG कार्समध्ये असं वाढवा मायलेज, ४ टिप्सनं होईल खर्च अर्धा; जाणून घ्या माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:49 PM2022-11-23T12:49:57+5:302022-11-23T13:00:30+5:30

Improve mileage of CNG car: बरेच जण कार घेताना त्याचं मालयेज काय हे विचारताना दिसतात.

Improve mileage of CNG car: बरेच जण कार घेताना त्याचं मालयेज काय हे विचारताना दिसतात. हल्लीच्या दिवसांमध्ये ते महत्त्वाचंच आहे. लोक जास्त मायलेजसाठी सीएनजी वाहने घेतात. मात्र कार जसजशी जुनी होते तसं त्याचं मायलेजही कमी होत असल्याचं जाणवतं.

तुम्ही कोणत्याही सीएनजी वाहनाबाबत निष्काळजी असाल तर त्याचे मायलेजही पेट्रोल वाहनापेक्षा कमी होऊ शकते. तुम्हीही सीएनजी वाहन चालवत असाल तर आम्ही तुम्हाला अशा ४ टिप्स सांगत आहोत ज्याद्वारे तुमच्या सीएनजी कारचे मायलेज वाढेल.

हवेच्या तुलनेत सीएनजी फारच हलका असतो. जर तुमच्या कारचे एअर फिल्टर खराब असेल तर सीएनजी त्यातून जाऊ शकणार नाही आणि इंजिनवर दबाव वाढेल. त्यामुळे कारचे एअर फिल्टर नियमितपणे स्वच्छ करा.

तुमच्या वाहनाचे टायर रस्त्याच्या थेट संपर्कात असतात. त्यामुळे त्यात काही कमतरता असल्यास वाहनाच्या मायलेजवर परिणाम होतो. टायरमध्ये हवा कमी असेल तर इंजिनला जास्त काम करावे लागते. म्हणूनच जेव्हाही तुम्ही प्रवासाला जाल तेव्हा वाहनाच्या टायरमधील हवा तपासा.

कालांतराने सीएनजी किटमध्ये लिकेज सुरू होतं. काही जण स्वस्तात सीएनजी किट बसवतात, त्यांनाही अशी समस्या भेडसावते. सिलेंडरला जोडणाऱ्या पाईपमधून गळती होत आहे का ते वेळोवेळी तपासत राहा. यामुळे मायलेजवर तर परिणाम होतोच, पण जीवालाही धोका असतो.