Driving Licence साठीचे बदलले नियम; RTO मध्ये द्यावी लागणार नाही टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 06:24 PM2021-07-02T18:24:50+5:302021-07-02T18:28:32+5:30

Driving Licence In India : पाहा काय झाले मोठे बदल. कसा मिळवता येईल नवा ड्रायव्हिंग लायसन्स.

Driving License New Rule: ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करीत सरकारने आपल्या नियमात मोठा बदल केला आहे.

वाहन चालवण्यासाठी आवश्यक लायसन्स घेण्यासाठी अर्जदारांना आता आरटीओ ऑफिसच्या प्रक्रियेतून जावं लागणार नाही. वाहनचालकांना परवाना देण्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सुधारित नियम गुरूवारपासून लागू झाले आहेत.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिकृत चालक प्रशिक्षण केंद्रांच्या नियमांना अधिसूचित केले आहे.

या मान्यताप्राप्त केंद्रांमधील उमेदवारांना उच्च दर्जाचे ड्रायव्हिंग कोर्स उपलब्ध करुन दिले जातील. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवाराला ड्रायव्हिंग लायसन्स घेताना ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक असणार नाही.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे म्हणणे आहे की या प्रशिक्षण केंद्रांमध्ये सिम्युलेटर आणि उमेदवारांना उच्च-गुणवत्तेचे प्रशिक्षण देण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक देण्यात येतील.

मंत्रालयाचे म्हणणे आहे की कुशल वाहनचालकांची कमतरता हा इंडियन रोडवे सेक्टरमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि रस्ते नियमांची माहिती नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात.

अधिकृत चालक प्रशिक्षण केंद्रांना मान्यता ही केवळ ५ वर्षांसाठी देण्यात येणार आहे. याशिवाय त्याचं नूतनीकरण करणंही शक्य आहे.

अधिकृत ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर्समध्ये लाईट मोटर व्हेईकल ड्रायव्हिंग कोर्सचा कालावधी हा कोर्स सुरू झाल्याच्या तारखेपासून ४ आठवड्यांमध्ये जास्तीतजास्त २९ तासांचा असेल.

दरम्यान, मध्यम आणि हेवी मोटर व्हेईकलचा ड्रायव्हिंग कोर्सचा कालावधी सहा आठवड्यांमध्ये जास्तीतजास्त ३८ तासांचा असेल.

लाईट मोटर ड्रायव्हिंग कोर्स आणि मध्यम, हेवी मोटर कोर्सदेखील थेअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये विभागला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.लाईट मोटर ड्रायव्हिंग कोर्स आणि मध्यम, हेवी मोटर कोर्सदेखील थेअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये विभागला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.