शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पगार सोडून 'वरची कमाई' भोवली! राज्यात १० वर्षांत ७ हजार ८८६ लाचखोरांवर एसीबीचा स्ट्राईक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:11 IST

एसीबीचा लाचखोरांवर स्ट्राईक! १० वर्षांत हजारो गुन्हे नोंद; गेल्या दशकातील सापळा कारवाईचा संपूर्ण तपशील.

- राजन मंगरूळकर
परभणी :
काही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना मिळणारा पगार सोडून वर कमाई हवीशी वाटते. यातच खिसा भरण्यासाठी काही जणांकडून चिरीमिरी घेतली जाते. अशा पद्धतीने कमाई करणाऱ्यांच्या मलाईवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची करडी नजर असते. या विभागाकडून अशा लाच घेणाऱ्यांवर कारवाई करीत गुन्हे नोंद केले जातात. राज्यात मागील दहा वर्षात विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मिळून एकूण ७ हजार ८८६ यशस्वी सापळे केले आहेत.

शासकीय कार्यालयांमध्ये किंवा निमशासकीय तसेच महामंडळ व अन्य विभागात सर्वसामान्य नागरिकांना त्यांची कामे योग्य वेळेत व्हावीत असे वाटते. मात्र, काही ठिकाणी या कामामध्ये अधिकारी, कर्मचारी लाचेची मागणी करून खोडा घालतात. लाचखोरांना वेळीच रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लाच देऊ नका, यासाठी विविध माध्यमातून नागरिकांत जनजागृती केली जाते. विविध शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी याबाबत फलक लावले जातात. लाच देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा आहे. याविषयी माहिती असताना देखील अनेकजण लाच मागणी करत असल्याचे समोर येते. अशा लाचखोरांवर संबंधित विभागाकडून कारवाई अन् गुन्हा नोंद केला जातो. तक्रारदार देखील सजग झाल्याने माहिती देण्यासाठी पुढे येत असून यातूनच विविध ठिकाणी हे सापळे यशस्वीरीत्या पूर्ण होत आहेत.

वर्षनिहाय सापळे
सन २०१६ ९८५

सन २०१७ ८७५
सन २०१८ ८९१

सन २०१९ ८६६
सन २०२० ६३०

सन २०२१ ७६४
सन २०२२ ७२८

सन २०२३ ७९५
सन २०२४ ६८३

सन २०२५ ६६९

दाखल गुन्ह्यांचा आलेख उतरता
सन २०१४ मध्ये १ हजार २४५, सन २०१५ मध्ये १ हजार २३४ एवढ्या सापळा कारवाई झाल्या होत्या. या दोन वर्षात हजारपेक्षा अधिक सापळे होते. मात्र, त्यानंतर सन २०१६ पासून ते सन २०२५ पर्यंत दरवर्षी सातत्याने गुन्ह्यांचा आलेख संख्यात्मक तुलनेत उतरता झाला आहे.

एसीबीचे राज्यात आठ परिक्षेत्र
पोलिस यंत्रणेतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एकूण आठ परिक्षेत्र आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या परिक्षेत्रांचा समावेश होतो. या परिक्षेत्रात विविध जिल्हे समाविष्ट आहेत. सापळा कारवाई सोबतच अपसंपदा आणि अन्य भ्रष्टाचाराची देखील गुन्हे नोंद होतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Greed beyond salary: ACB nets 7,886 bribe-takers in Maharashtra.

Web Summary : Over the last decade, Maharashtra's Anti-Corruption Bureau (ACB) successfully trapped 7,886 officials accepting bribes. Despite awareness campaigns, bribery persists, prompting increased citizen vigilance. While initial years saw higher cases, recent years show a decline in reported bribery incidents across various government sectors.
टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी