५ दिवसांपासून गायब शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळला; खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 12:11 IST2021-07-28T12:09:57+5:302021-07-28T12:11:19+5:30

याप्रकरणी मृताच भाऊ मदन श्रवने यांच्या फिर्यादीवरून बुधवारी पहाटे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The body of a farmer who had been missing for 5 days was found in a well; Filed a murder charge | ५ दिवसांपासून गायब शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळला; खुनाचा गुन्हा दाखल

५ दिवसांपासून गायब शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळला; खुनाचा गुन्हा दाखल

पाथरी ( परभणी ) : शेतात जाण्यासाठी घरातून निघालेल्या गणेश सीताराम  श्रवणे ( 45, रा रेनाखळी ) यांचा मृतदेह मंगळवारी ( दि. २७ ) रेनाखळी शिवारातील विहिरीत आढळून आला. दि. २३ जुलैपासून गणेश श्रवणे गायब होते. याप्रकरणी मृताच भाऊ मदन श्रवने यांच्या फिर्यादीवरून बुधवारी पहाटे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथरी तालुक्यातील रेनाखळी येथील गणेश श्रवणे दि. २३ जुलै रोजी शेतात जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने त्यांची पत्नी जिजाबाई यांनी दि. २४ जुलै रोजी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, दि. २७ जुलै रोजी दुपारी रेनाखळी शिवारातील वामन कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत दुपारी 2 वाजेच्या सुमारास गणेश श्रवणे यांचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी मृताचा भाऊ मदन श्रवने यांच्या फिर्यादीवरून बुधवारी पहाटे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण करत आहेत. 

Web Title: The body of a farmer who had been missing for 5 days was found in a well; Filed a murder charge