शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:03 IST

युकी अन् मायकेल जोडीसमोर फिकी ठरली  निकोला अन् राजीव राम ही जोडी

US Open 2025 : अमेरिकन ओपन स्पर्धेत पुरुष एकेरी किंवा महिला एकेरीत एकही भारतीय खेळाडू आपली जागा निश्चित करू शकला नाही. पण पुरुष दुहेरीत मात्र जेतेपदाची आस निर्माण झालीये. भारताचा टेनिसपटू युकी भांबरी याने आपल्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करून दाखवताना पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. न्यूझीलंडच्या मायकेल व्हीनससोबत युकी भांबरीनं उपात्य पूर्व फेरीत क्रोएशियाचा निकोला मेकटिच आणि अमेरिकेचा राजीव राम या अनुभवी जोडीला पराभवाचा धक्का दिला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

युकी अन् मायकेल जोडीसमोर फिकी ठरली  निकोला अन् राजीव राम ही जोडी

 

युकी भांबरी आणि मायकेल व्हीनस जोडीनं पुरुष दुहेरीतील उपांत्य पूर्व फेरीत कमालीची सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये  निकोला मेकटिच आणि राजीव राम जोडीला ६-३ असे बॅकफूटवर ढकलेले.  दुसऱ्या सेटमध्ये कांटे की टक्कर झाली. पण इथंही युकी भांबरी आणि मायकेल व्हीनसनं टाय ब्रेकरमध्ये बाजी मारत हा सेट  ७-६ (८-६) अशा फरकाने आपल्या नावे केला. तिसऱ्या सेट ६-३ असा जिंकत या जोडीनं स्पर्धेतील आपली आगेकूच कायम ठेवली. आता उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर नील स्कूप्स्की आणि जो सॅलिसबरी जोडीचे आव्हान असेल.

आशिया चषक हॉकी: यजमान भारताला कोरियाने रोखले; निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत

पहिल्यांदाच खेळणार ग्रँडस्लॅम स्पर्धेत मारली उपांत्य फेरीत धडक

३३ वर्षीय भारतीय टेनिस स्टारनं  टेनिस कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या सेमफायनलमध्ये धडक मारली आहे.  याआधी भांबरी याने अल्बानो ओलिवेटी याच्या साथीनं अमेरिकेन ओपन स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी त्याचा प्रवास हा उपांत्य पूर्व फेरीतच संपुष्टात आला होता. जर फायनल गाठून इतिहास रचायचा असेल तर आता युकी भांबरी आणि मायकेल व्हीनस जोडीला टेनिस क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या जोडीला नमवावे लागेल.

 आतापर्यंत ३ भारतीयांनी जिंकली आहे US ओपन स्पर्धा 

अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात एकाही भारतीयाला एकेरीत जेतेपद मिळवता आलेले नाही. पण मिश्र दुहेरीत भारतीय खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली आहे. भारताचा टेनिस स्टार महेश भुपती लिएंडर पेस माजी महिला टेनिसपटू  सानिया मिर्झा यांनी मिश्र दुहेरीत छाप सोडल्याचा रेकॉर्ड आहे. जर युकी भांबरीनं फायनल मारली तर पुरुष दुहेरीत जेतेपद पटकवणारा तो पहिला भारतीय ठरेल.

 

 

टॅग्स :TennisटेनिसAmericaअमेरिका