शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रणजी चॅम्प गुजरातचा सामना शेष भारताशी

By admin | Updated: January 20, 2017 05:28 IST

नवीन रणजी चॅम्पियन गुजरातचा सामना आज, शुक्रवारपासून येथे ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू होणाऱ्या इराणी करंडक क्रिकेट सामन्यात शेष भारताशी होणार

मुंबई : नवीन रणजी चॅम्पियन गुजरातचा सामना आज, शुक्रवारपासून येथे ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू होणाऱ्या इराणी करंडक क्रिकेट सामन्यात शेष भारताशी होणार आहे. या दोन प्रतिस्पर्ध्यांतील चुरशीच्या लढतीची पर्वणी क्रिकेट रसिकांना मिळणार आहे.या लढतीत भारतीय संघाच्या निवडीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या खेळाडूंना निवड समितीचे लक्ष आकर्षून घेण्याची ही संधी असेल. कारण भारताला नजीकच्या भविष्यात पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. तथापि, सध्या तरी भारतीय कसोटी संघात जागा रिक्त नाही; परंतु इराणी करंडकमध्ये चांगली कामगिरी करून भविष्यात संधी निर्माण करण्याची खेळाडूंना संधी असेल. गुजरातला रणजी करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पार्थिव पटेलला रिद्धिमान साहा याच्यापेक्षा सरस यष्टिरक्षक फलंदाज म्हणून सिद्ध करण्याची ही एक सुवर्णसंधी असेल. तथापि, पार्थिव मात्र त्याच्यात व साहा याच्यात स्पर्धा मानत नाही.पार्थिव म्हणाला, ‘हा सामना दोन खेळाडूंत नसून, गुजरात आणि शेष भारत यांच्यात आहे.’ तमिळनाडूला उपांत्य फेरीत पोहोचविण्यात योगदान देणाऱ्या अभिनव मुकुंद याच्याजवळ त्याची उपयुक्तता सिद्ध करण्याची संधी असेल. निवड समितीचे लक्ष मुंबईचा अखिल हेरवाडकर आणि गुजरातचा सलामीवीर प्रियांक पांचाल यांच्यावरही असेल. या दोघांनी १० सामन्यांत १,३00 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वाखाली शेष भारताचा संघ कागदावर तरी तुल्यबळ दिसत आहे. त्यांच्याकडे करुण नायरसारखा फलंदाज आहे. नायरने चेन्नईत इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत त्रिशतक ठोकले होते. मधल्या फळीत मनोज तिवारी व साहा आहेत. सीनिअर वेगवान गोलंदाज पंकज सिंह, सिद्धार्थ कौल, सिराज आणि विग्नेश यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असेल, तर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी कुलदीप यादव आणि शाहबाज नदीमवर असेल.प्रतिस्पर्धी संघ (शेष भारत) : चेतेश्वर पुजारा (कर्णधार), अभिनव मुकुंद, अखिल हेरवाडकर, करुण नायर, मनोज तिवारी, रिद्धमान साहा, कुलदीप यादव, शाहबाज नदीम, पंकज सिंह, के. विग्नेश, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, अक्षय वखारे, ईशान किशन, प्रशांत चोपडा. गुजरात : पार्थिव पटेल (कर्णधार), समित गोहील, प्रियांक पांचाल, हेत पटेल, राहुल भट, मनप्रीत जुनेजा, चिराग गांधी, रुष कलारिया, मोहित थडानी, करण पटेल, हार्दिक पटेल, चिंतन गाजा, ध्रुव रावल, आर. पी. सिंग, ईश्वर चौधरी.