शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या प्रांजलची अंतिम फेरीत धडक

By admin | Updated: May 6, 2016 20:58 IST

प्रांजल येडलापल्लीने आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 6-  भारताच्या प्रांजल येडलापल्लीने मुलींच्या अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून फिलिपिन्सच्या किम इजलुपसचा चुरशीच्या झालेल्या उपांत्य लढतीत २-१ सेटने पराभव करून आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शुक्रवारी झालेल्या दुहेरीच्या अंतिम फेरीत मुलांच्या गटात तोरू होरी व युनोसुकी तनाका व मुलींच्या गटात रिफंती काफिआनी व तैपेईच्या यांग ली यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद जिंकले. महाराष्ट्र राज्य व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत भारताच्या व पाचव्या मानांकित सध्याचा जागतिक क्र. ९४ असलेल्या प्रांजल येडलापल्लीने आपली विजयी मालिका कायम ठेवत फिलिपिन्सच्या किम इजलुपसचा २-६, ६-४, ६-२ असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना सुमारे दोन तास चालला. चीन्या झियु वांगने सहाव्या मानांकित व चीनच्याच यांग लीचा ६-१, ६-२ असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत तोरू होरी व युनोसुकी तनाका या जोडीने चेंगझी लिऊ व लिंगक्सी झाओचा ६-३, ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले. मुलींच्या गटात इंडोनेशियाच्या रिफंती काफिआनी व तैपेईच्या यांग ली या जोडीने मायुका एकावा व प्रांजल येडलापल्लीचा ६-४, ६-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी राष्ट्रीय डेव्हिस कप प्रशिक्षक नंदन बाळ आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संयोजन सचिव आश्विन गिरमे आणि आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर उपस्थित होते. स्पर्धेत दुहेरी गटांतील विजेत्या जोडीला १२० आयटीएफ गुण, तर उपविजेत्या जोडीला ८० गुण मावळा व महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केलेली बाहुली करंडक पारितोषिक म्हणून देण्यात आले. निकाल : (उपांत्य फेरी) मुली : प्रांजल येडलापल्ली (भारत, ५) वि. वि. किम इजलुपस (फिलिपिन्स) २-६, ६-४, ६-२; झियु वांग (चीन) वि. वि. यांग ली (चीन, ६) ६-१, ६-२;मुले : ताजिमा नाओकी (जपान, ८) वि. वि. टँग ए. (हाँगकाँग, ७) ७-६ (३), ६-३; लिम अलबेर्टो (फिलिपिन्स, २) वि. वि. युता शिमीझु (जपान, ३) ६-७ (३), ६-३, ६-३; * दुहेरी गट : मुली : अंतिम फेरी : रिफंती काफिआनी (इंडोनेशिया) / यांग ली (तैपेई) वि. वि. मायुका एकावा (जपान) / प्रांजल येडलापल्ली (भारत) ६-४, ६-३; मुले : अंतिम फेरी : तोरू होरी / युनोसुकी तनाका वि. वि. चेंगझी लिऊ / लिंगक्सी झाओ ६-३, ६-४. (क्रीडा प्रतिनिधी)