शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: भारतीय अॅथलेटिक्सची तिसरी सर्वोत्तम कामगिरी, सुवर्णपदकांचा पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 09:24 IST

Asian Games 2018: भारतीय अॅथलेटिक्सपटूंची आशियाई स्पर्धेतील मोहीम सात सुवर्ण, 10 रौप्य आणि दोन कांस्यपदकांनी संपली. ट्रॅक अॅण्ड फिल्ड स्पर्धेच्या अखेरच्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारतीय अॅथलेटिक्सपटूंची आशियाई स्पर्धेतील मोहीम सात सुवर्ण, 10 रौप्य आणि दोन कांस्यपदकांनी संपली. ट्रॅक अॅण्ड फिल्ड स्पर्धेच्या अखेरच्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले. भारतीय अॅथलेटिक्सपटूंची ही आशियाई स्पर्धेतील तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी भारतीय अॅथलेटिक्सपटूंनी 1951 मध्ये 34 ( 10 सुवर्ण, 12 रौप्य आणि 12 कांस्य) आणि 1982 मध्ये 21 (4 सुवर्ण, 9 रौप्य व 8 कांस्य)  पदकांची कमाई केली होती आणि या दोन्ही स्पर्धा नवी दिल्ली येथे झाल्या होत्या. त्यामुळे जकार्तात भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी ही परदेशातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. 

भालाफेकीतील पहिलेच सुवर्णनीरज चोप्राने ( 88.06 मीटर) आशियाई स्पर्धेत भारताला भालाफेकीतील पहिलेच सुवर्णपदक जिंकून दिले. 1982 मध्ये भारताच्या गुरतेज सिंग यांना कांस्यपदक जिंकण्यात यश मिळवले होते. 

1952 नंतर पहिल्यांदाच सुवर्ण दौडजिन्सन जॉन्सनने ( 3:44.72 से.) 1500 मीटर शर्यतीत जिंकलेले सुवर्ण हे 1952नंतरचे या क्रीडा प्रकारातील पहिले सुवर्णपदक आहे. निक्का सिंग यांनी 1952च्या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. 1998 च्या स्पर्धेनंतर 1500 मीटरमध्ये पदक जिंकणारा जॉन्सन हा पहिलाच खेळाडू आहे.

उषाच्या पावलावर द्युतीची वाटचालपी. टी. उषा यांच्यानंतर एकाच आशियाई स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीत पदक जिंकण्याचा मान द्युती चंदने पटकावला. द्युतीने दोन्ही प्रकारात रौप्यपदक नावावर केले. 

मनजिंत सिंगने सर्वांना धक्का दिलामनजित सिंगने ( 1:46.15 मी.) भारताचा आशियाई स्पर्धेतील 800 मीटर शर्यतीतील सुवर्ण दुष्काळ संपवला. 1982च्या आशियाई स्पर्धेत चार्ल्स बोरोमेओ यांनी 800 मीटरचे सुवर्ण जिंकले होते. 

बर्मनची स्वप्नपूर्तीहेप्टॉथ्लॉन स्पर्धेत भारताच्या स्वप्ना बर्मनने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात सुवर्ण जिंकणारी ती पहिलीच खेळाडू ठरली. यापूर्वी सोना बिस्वास ( रौप्य ) आणि जेजे सोभा ( कांस्य ) यांनी 2002 मध्ये, तर प्रमिला अयप्पा ( कांस्य) यांनी 2010 मध्ये पदक जिंकले होते. 

 पाचपैकी पाचभारताच्या महिला धावपटूंनी 4 बाय 400 मीटर शर्यतीत सलग पाचवे सुवर्णपदक नावावर केले. हिमा दास, एम आर पुवम्मा, सरिताबेन गायकवाड आणि विस्मया वेल्लूवा कोरोथ यांचा समावेश असलेल्या 4 बाय 400 मीटर रिले संघाने 3 मिनिटे 28.72 सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक नावाव केले. हिमा आणि पुवम्मा यांचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले. याआधी हिमाने 400 मीटर शर्यतीत रौप्य, तर पुवम्माने 4 बाय 400 मीटर मिश्र रिले संघाचे रौप्य जिंकले होते. 

तूर डी जकार्ताभारताचा गोळाफेकपटू तेजिंदर पाल तूरने जकार्तात सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने 2002 नंतर भारताला आशियाई स्पर्धेतील गोळाफेकीचे पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाHima Dasहिमा दासDutee Chandद्युती चंद