शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

बलाढ्य महाराष्ट्राच्या खो-खो संघाची घोषणा

By admin | Updated: May 26, 2016 00:33 IST

सुरत येथे २८ ते ३० मे दरम्यान रंगणाऱ्या चौथ्या पश्चिम विभागीय कुमार व मुली राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली. मुंबई उपनगरचा

मुंबई : सुरत येथे २८ ते ३० मे दरम्यान रंगणाऱ्या चौथ्या पश्चिम विभागीय कुमार व मुली राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली. मुंबई उपनगरचा ॠषिकेश मुर्चावडे याच्याकडे कुमार संघाचे तर ठाण्याच्या दीक्षा कदम हिच्याकडे मुलींचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. गतवर्षी ओडिशा येथे झालेल्या ३५व्या कुमार व मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने दुहेरी मुकुट पटकावताना स्पर्धेत एकहाती दबदबा राखला होता. विशेष म्हणजे या वेळी ॠषिकेशने मुलांच्या गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानाचा वीर अभिमन्यू पुरस्कार पटकावला होता. निवड झालेल्या कुमार संघात मुंबई उपनगर व ठाणे येथील सर्वाधिक प्रत्येकी ३ खेळाडूंचा समावेश आहे. तर सांगलीचे दोन आणि पुणे, अहमदनगर, मुंबई शहर आणि उस्मानाबाद येथील प्रत्येकी एका खेळाडूचा संघात समावेश आहे. तसेच मुलींच्या संघात ठाणेकरांनी वर्चस्व राखले असून त्यांचे एकूण ३ खेळाडू संघात आहेत. यानंतर पुण्याचे दोन आणि रत्नागिरी, उस्मानाबाद, औरंगाबाद, अहमदनगर, मुंबई शहर, सातारा आणि नाशिकच्या प्रत्येकी एका खेळाडूची संघात वर्णी लागली आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ २७ मे रोजी रवाना होणार आहेत. निवड झालेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही संघाचे सराव शिबीर सत्र वांद्रे येथील महात्मा गांधी विद्यामंदिर येथे सुरु आहे. (क्रीडा प्रतिनिधी)निवडण्यात आलेले संघ :कुमार संघ : ॠषिकेश मुर्चावडे (कर्णधार), जयेश गावडे, प्रतीक देवरे (सर्व मुंबई उपनगर), संकेत कदम, आदित्य कांबळे, चिराग आंगलेकर (सर्व ठाणे), राहुल एडके, प्रद्युम्न पाटील (दोघेही सांगली), प्रतीक बांगर (पुणे), तेजस मगर (अहमदनगर), निखिल कांबळे (मुंबई शहर) आणि अविनाश मते (उस्मानाबाद). प्रशिक्षक : उमेश आटवणे (नाशिक). व्यवस्थापक : नितीन पानवलकर (मुंबई उपनगर)मुलींचा संघ : दीक्षा कदम (कर्णधार), प्रियांका भोपी, रूपाली बडे (सर्व ठाणे), प्रणाली बेनके, प्रियांका इंगळे (दोघीही पुणे), तन्वी कांबळे (रत्नागिरी), ॠतुजा खरे (उस्मानाबाद), सोनाली बावणे (औरंगाबाद), निकिता मरकड (अहमदनगर), मधुरा पेडणेकर (मुंबई शहर), प्रतीक्षा खुरंगे (सातारा) आणि हेमलता गायकवाड (नाशिक). प्रशिक्षक : पंकज चवंडे (रत्नागिरी). व्यवस्थापिका : पल्लवी वेंगुर्लेकर (मुंबई उपनगर)