शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमधील मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना पोलिसांची ताकीद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 15:21 IST

पनवेल विधानसभा मतदार संघात सध्याच्या घडीला प्राथमिक सुविधांवरून नागरिकांनी नोटा मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देपनवेल विधानसभा मतदार संघात सध्याच्या घडीला प्राथमिक सुविधांवरून नागरिकांनी नोटा मोहीम सुरू केली आहे.नोटा अंतर्गत आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी कोणतेही आंदोलन न करण्याची तंबी दिली आहे.बुधवारी (16 ऑक्टोबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये येणार आहेत.

पनवेल - पनवेल विधानसभा मतदार संघात सध्याच्या घडीला प्राथमिक सुविधांवरून नागरिकांनी नोटा मोहीम सुरू केली आहे. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले असून काही नागरिकांनी यासंदर्भात आवाज उठविण्याचा देखील प्रयत्न केला आहे. खारघर, कामोठे, रोडपाली आदी ठिकाणचे रहिवासी या मोहिमेत रस्त्यावर उतरले आहेत. मात्र  बुधवारी (16 ऑक्टोबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये येणार असल्याने या नोटा अंतर्गत आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी कोणतेही आंदोलन न करण्याची तंबी दिली आहे.

सोशल मीडियावर 'नो वर्क नो व्होट' ही मोहीम चालविणाऱ्या कळंबोली येथील दीपक सिंग यांना बुधवारी (16 ऑक्टोबर) कळंबोली पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास त्यांचे घर गाठत अटक केली. दीपक सिंग यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. आम्हाला उद्भवणाऱ्या समस्या बद्दल आम्ही काहीच बोलायचे नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. दीपक सिंग यांच्यासह अनेक जणांना खारघर, कळंबोली पोलिसांनी भेटून कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करण्याचा दम दिल्याची माहिती मिळत आहे. 

पनवेल, डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दुपारी 3.30 वाजता खारघर येथे प्रचार सभा घेणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. खारघरमधील सेक्टर 29 येथील सेंट्रल पार्क जवळील भव्य मैदानात पंतप्रधान मोदींची सभा पार पडणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक सुविधांवरून नागरिकांनी नोटा मोहीम सुरू केली आहे. नोटा अंतर्गत आंदोलन छेडणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ताकीद दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आदींसह राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री या सभेला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, पेणचे उमेदवार रवी पाटील, ऐरोलीचे उमेदवार गणेश नाईक आणि बेलापूरच्या उमेदवार मंदा म्हात्रे या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस