महाराष्ट्रात निवडणुका कुठंयत?; कोरोनावाढीला निवडणुकांशी जोडणं चुकीचं; अमित शाह यांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 05:47 PM2021-04-18T17:47:18+5:302021-04-18T17:51:35+5:30

Coronavirus : सध्या देशात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. गेल्या चोवीस तासांत अडीच लाखांपेक्षा अधिक रुग्णांची झाली नोंद

Where are the elections in Maharashtra ?; It is wrong to link coronation to elections; Opinion of Amit Shah | महाराष्ट्रात निवडणुका कुठंयत?; कोरोनावाढीला निवडणुकांशी जोडणं चुकीचं; अमित शाह यांचं मत

महाराष्ट्रात निवडणुका कुठंयत?; कोरोनावाढीला निवडणुकांशी जोडणं चुकीचं; अमित शाह यांचं मत

Next
ठळक मुद्देसध्या देशात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंदगेल्या चोवीस तासांत अडीच लाखांपेक्षा अधिक रुग्णांची झाली नोंद

देशात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशात पहिल्यांदाच २ लाख ६० हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत देशात पुन्हा लॉकडाऊन लागेल का असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. तर दुसरीकडे एकीकडे लॉकडाऊन सारखी परिस्थिती आणि दुसरीकडे निवडणुकांची रॅली यावरही अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान, यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येला निवडणुकांशी जोडणं योग्य नसल्याचं म्हटलं. ज्या राज्यांमध्ये सध्या निवडणुका झाल्या नाहीत त्या राज्यांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याचं त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं. 

"पाहा, महाराष्ट्रात निवडणुका आहेत का? त्या ठिकाणी ६० हजार रुग्णांची नोंद होत आहे. पश्चिम बंगालमध्ये ४ हजार रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रासाठीही मला सहानुभूती आहे आणि पश्चिम बंगालसाठीही. या गोष्टीला निवडणुकांसोबत जोडणं योग्य नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे. आता तुम्ही काय सांगाल?," असं अमित शाह म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.  

लॉकडाऊनवरही भाष्य

मुलाखतीदरम्यान अमित शाह यांना गेल्या वर्षीप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय आहे का? असा सवाल करण्यात आला. "आम्ही स्टेकहोल्डर्ससोबत चर्चा करत होते. सुरूवातीला लॉकडाऊन संदर्भातला उद्देश हा निराळा होता. आम्हाला पायाभूत सुविधा आणि उपचाराशी रुपरेषा तयार करायची होती. तेव्हा आमच्याकडे कोणतंही औषध किंवा लस नव्हती. परंतु आता परिस्थिती निराळी आहे. तरीही आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत. जो काही एकमतानं निर्णय होईल त्यानुसार आम्ही पुढे जाऊ. परंतु सध्या घाईनं लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती दिसत नाही," असं अमित शाह उत्तर देताना म्हणाले.

आपण यावर विजय मिळवू 

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी बरेच उपक्रम सुरू झाले होते. आणीबाणीच्या गोष्टी आता का नाहीत असा सवालही अमित शाह यांना करण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, "हे खरे नाही. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत दोन बैठका झाल्या आणि त्यावेळी मीही हजर होतो. नुकतीच सर्व राज्याच्या राज्यपालांसोबतही बैठक पार पडली. सर्व सरकारांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील भागधारकांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आमची बैठक झाली आहे." लसीकरणाबाबत आमची वैज्ञानिकांशी चर्चा झाली आहे आणि प्रोटोकॉलमध्ये सुधारणा करण्यासाठीही एक बैठक झाली आहे. यासोबत लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. यावेळी कोरोनाच्या प्रसाराची गती इतकी अधिक आहे की ही लढाई थोडी कठीण आहे. परंतु यावर आपण नक्की विजय मिळवू असा विश्वास असल्याचं शाह म्हणाले. 

प्रत्येक जण चिंताग्रस्त

"कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल सर्वजण चिंताग्रस्त आहेत. मलाही त्याची चिंता आहे. आपले वैज्ञानिक यासोबत लढण्यासाठी काम करत आहेत. आपण नक्कीच जिंकू असा मला विश्वास आहे. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे असं वाटतंय. अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात संख्या वाढत आहे. वैज्ञानिक यावर अभ्यास करत आहेत आणि यावर वेळेपूर्वीच निष्कर्ष काढला जाईल," असा विश्वासही त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना व्यक्त केला.
 

Web Title: Where are the elections in Maharashtra ?; It is wrong to link coronation to elections; Opinion of Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.