शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

"राहुल गांधी काही डॉक्टर नाहीत", 'त्या' आरोपांवर थेट कंपनीने दिलं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 9:49 AM

कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्या मागील पाच दिवसांत लाखभराने वाढल्याने देशाने सात लाख रुग्णांचा टप्पा पार केला. मंगळवारी एका दिवसात 22 हजार 252 नवे रुग्ण आढळले. बाधितांची संख्या एक लाख होण्यासाठी 110 दिवसांचा कालावधी लागला तर त्यानंतर केवळ 49 दिवसांत आणखी सहा लाख रुग्णांची भर पडली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. कोरोना व्हायरसवरून जोरदार टीका करत आहेत. 

राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधताना निकृष्ट साहित्य खरेदी केलं जात असल्याचं म्हटलं होतं. तसेच खासगी कंपनीच्या व्हेंटिलेटर गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्याला आता व्हेंटिलेटर तयार करणाऱ्या कंपनीने उत्तर दिलं आहे. "राहुल गांधी डॉक्टर नाहीत, त्यांना व्हेंटिलेटर कसे तपासायचे हे माहीत नाही" असं म्हटलं आहे. व्हेंटिलेटर बनवणारी कंपनी अ‍ॅगवा व्हेंटिलेटरचे सह-संस्थापक प्रोफेसर दिवाकर वैश यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

दिवाकर वैश यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेंटिलेटरशी संबंधित बातम्यांची तपासणी न करता राहुल गांधी यांनी रिट्वीट केलं. राहुल गांधी डॉक्टर नाहीत, त्यांना व्हेंटिलेटर कसे तपासायचे हे माहीत नाही. भारतीय व्हेंटिलेटर्स कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाऊ नये ही आंतरराष्ट्रीय निर्मात्यांची इच्छा आहे. आणि म्हणूनच ते स्वदेशी प्रयत्न थांबवू पाहत आहेत. राहुल गांधी यांना हवे असल्यास व्हेंटिलेटर कसे कार्य करते याचा आम्ही डेमो देऊ शकतो.

राहुल यांनी काही दिवसांपूर्वी "पीएम केअर्स फंडाचा वापर करून कोरोना रूग्णांसाठी कमी दर्जाचे व्हेंटिलेटर खरेदी केले जात आहेत. पीएम केअर्समधील अस्पष्टतेमुळे भारतीयांचे जीव धोक्यात येत आहे आणि निकृष्ट साहित्य खरेदी करण्यासाठी सार्वजनिक पैशांचा उपयोग केला जात आहे" असं  म्हटलं होतं. तसेच त्या संदर्भातील एक माहितीही रिट्विट केली होती. यानंतर व्हेंटिलेटर तयार करणाऱ्या कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

"मी महाराज किंवा टायगर नाही, कमलनाथ आहे; कोण मांजर आणि कोण उंदीर हे जनता ठरवेल"

सावधान! 3 वर्षांनी पुन्हा आलाय 'हा' खतरनाक Android Virus; फक्त एक मेसेज अन्...

धक्कादायक! "माझी हत्या होऊ शकते", कोरोनाग्रस्त पत्रकाराच्या आत्महत्येनंतर 'ते' चॅट व्हायरल

राहुल गांधींनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, 'हे' प्रश्न विचारत केला हल्लाबोल

CoronaVirus News : मुंबई, दिल्लीतून आनंदाची बातमी पण देशातील 'या' राज्यांनी वाढवली चिंता

कामासाठी काय पण! लग्न मंडपातच नवरीने घेतला लॅपटॉप अन्...; Video तुफान व्हायरल

Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! गुंड गोळीबार करत होते तरी पोलिसाने केला दीड किमीपर्यंत पाठलाग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसGovernmentसरकारhospitalहॉस्पिटल