fakesky android virus return 3 years cybereason nocturnus report | सावधान! 3 वर्षांनी पुन्हा आलाय 'हा' खतरनाक Android Virus; फक्त एक मेसेज अन्...

सावधान! 3 वर्षांनी पुन्हा आलाय 'हा' खतरनाक Android Virus; फक्त एक मेसेज अन्...

नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेकजण अ‍ॅक्टिव्ह असतात. मात्र हल्ली युजर्सच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. काही महिन्यांपूर्वी फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान आता आणखी एका व्हायरसचं सावट असल्याची मााहिती समोर आली आहे. धोकादायक आणि पॉवरफुल असलेला एक जुना व्हायरस तब्बल तीन वर्षांनी परतला आहे. धक्कादायक म्हणजे हा व्हायरस बँक डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती सहज चोरू शकतो. 

फेकस्काय (Fakesky) असं या मॅलवेअरचं नाव असून ऑक्टोबर 2017 मध्ये सापडला होता. त्यावेळी या व्हायरसने जपान आणि दक्षिण कोरियामधील लोकांना त्याचे लक्ष्य बनवले होते. मात्र आता Cybereason Nocturnus के रिसर्चर्स हा व्हायरस जगभरातील युजर्सना त्याचे लक्ष्य करत असल्याची माहिती दिली आहे. चीन, तैवान, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनीआणि इतर काही देशातील नागरिक या व्हायरसच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे. 

फेकस्काय मॅलवेअर यावेळी पोस्ट सेवेमार्फत मेसेज करून लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. आताही मॅलवेअरची नजरही कोट्यवधी नागरिकांच्या बँक खात्यावर आहे. रिपोर्टनुसार हा मालवेअर Smishing किंवा SMS फिशिंग हल्ला करून युजर्सना लक्ष्य करत आहे. हा युजर्सना एक मेसेज पाठवतो आणि एक App डाऊनलोड करण्यास सांगतो. हे App डाऊनलोड केल्यास त्याकडून काही परवानगी मागितल्या जातात. 

पहिल्या परवानगीनंतर मॅलवेअर तुमच्या मोबाईलमधील मेसेज वाचू शकतो दुसऱ्या परवानगी नंतर तुमचे डिव्हाईस लॉक झाल्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये काम चालू राहते. परवानगी मिळाल्यानंतर युजरची फोन नंबर, डिव्हाईस मॉडेल, OS व्हर्जन, टेलिकॉम प्रोव्हायडर, बँक डिटेल्स, IMEI नंबर आणि IMSI नंबर यासारखी अत्यावश्यक माहिती मागितली जाते आणि डेटा चोरी केला जातो. काही संशोधकांच्या मते Roming Mantis यामागे काम करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! "माझी हत्या होऊ शकते", कोरोनाग्रस्त पत्रकाराच्या आत्महत्येनंतर 'ते' चॅट व्हायरल

राहुल गांधींनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, 'हे' प्रश्न विचारत केला हल्लाबोल

CoronaVirus News : मुंबई, दिल्लीतून आनंदाची बातमी पण देशातील 'या' राज्यांनी वाढवली चिंता

कामासाठी काय पण! लग्न मंडपातच नवरीने घेतला लॅपटॉप अन्...; Video तुफान व्हायरल

Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! गुंड गोळीबार करत होते तरी पोलिसाने केला दीड किमीपर्यंत पाठलाग

India China Faceoff : मोदी सरकार चीनविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
 

Web Title: fakesky android virus return 3 years cybereason nocturnus report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.