I am not a ‘maharaja’ or ‘mama’, I am Kamal Nath: Former MP CM | "मी महाराज किंवा टायगर नाही, कमलनाथ आहे; कोण मांजर आणि कोण उंदीर हे जनता ठरवेल"

"मी महाराज किंवा टायगर नाही, कमलनाथ आहे; कोण मांजर आणि कोण उंदीर हे जनता ठरवेल"

धार - कोरोनाच्या संकटात अनेक अडचणींवर मात करत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या 'जंबो कॅबिनेट'चा विस्तार करण्यात आला. ज्योतिरादित्य शिंदे आणि भाजपामधील त्यांचे समर्थक असलेल्या आमदारांना शिवराज मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. एकंदरीत यामुळे मध्य प्रदेशमधील राजकीय वातावरण तापले आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ज्योतिरादित्य शिंदे आणि शिवराजसिंह चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे. कोण मांजर आणि कोण उंदीर आहे हे मध्य प्रदेशची जनता ठरवेल असं म्हणत हल्लाबोल केला आहे.

काही दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी 'टायगर अभी जिंदा है' असं म्हटलं होतं. याला आता कमलनाथांनी प्रत्युत्तर दिलं आहे. धार जिल्ह्यातील बदनावारमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी शिंदे आणि चौहान यांना टोला लगावला आहे. "मी महाराज नाही... मी टायगरही नाही... मी मामाही नाही... मी कधी चहा विकला नाही... मी कमलनाथ आहे..कोण टायगर आहे आणि कोण नाही... कोण मांजर आहे कोण उंदीर हे मध्य प्रदेशची जनता ठरवेल" असं कमलनाथ यांनी म्हटलं आहे. 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी "मला कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्या प्रमाणपत्रांची गरज नाही. देशातील जनतेसमोर सत्य उघड आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी उत्तर देईन. सध्या या दोघांना मला इतकंच सांगायचं आहे की, 'टायगर अभी जिंदा है!" असं म्हटलं होतं. त्यानंतर आता कमलनाथांनी टोला लगावला आहे. भाजपाच्या मध्य प्रदेशातील नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वाकडे समर्थकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी शिंदेंनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. 

मध्यप्रदेशमध्ये चार महिन्यांपूर्वी शिंदे यांनी काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडून खळबळ उडवून दिली होती. राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या शिंदे यांनीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत 22 आमदार फोडले होते. यामुळे या जागांवर पोटनिवडणूक होऊ घातली आहे. यापैकी 16 जागा या शिंदे यांचे प्राबल्य असलेल्या ग्वाल्हेर, चंबळ भागातील आहेत. यामुळे या उमेदवारांना जिंकवून देण्याची जबाबदारीही शिंदे यांचीच आहे. यामुळे या भागातून काँग्रेसचे मोठे नेतेही भाजपात सहभागी होण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! 3 वर्षांनी पुन्हा आलाय 'हा' खतरनाक Android Virus; फक्त एक मेसेज अन्...

धक्कादायक! "माझी हत्या होऊ शकते", कोरोनाग्रस्त पत्रकाराच्या आत्महत्येनंतर 'ते' चॅट व्हायरल

राहुल गांधींनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, 'हे' प्रश्न विचारत केला हल्लाबोल

CoronaVirus News : मुंबई, दिल्लीतून आनंदाची बातमी पण देशातील 'या' राज्यांनी वाढवली चिंता

कामासाठी काय पण! लग्न मंडपातच नवरीने घेतला लॅपटॉप अन्...; Video तुफान व्हायरल

Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! गुंड गोळीबार करत होते तरी पोलिसाने केला दीड किमीपर्यंत पाठलाग

India China Faceoff : मोदी सरकार चीनविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: I am not a ‘maharaja’ or ‘mama’, I am Kamal Nath: Former MP CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.