शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

मोबाईल विकतानाची एक चूक बनली खून, आत्महत्या आणि एन्काऊंटरचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 11:41 AM

शनिवारी 35 वर्षीय महिलेने तिच्या 5 वर्षांच्या मुलासह कॅनॉलमध्ये उडी मारली. मात्र, तिच्या मुलाला वाचविण्यात आले. या महिलेचा मृत्यू झाला.

मेरठ : बऱ्याचदा नवीन मोबाईल घेण्यासाठी जुना मोबाईल विकण्यात येतो. उत्तर प्रदेशमधील युवक शुभम कुमारला जुना मोबाईल विकताना केलेली चूक महागात पडली आहे. या मोबाईलमुळे एक खून, एक आत्महत्या आणि पोलिस एन्काऊंटर घडले आहे. या घटनेमध्ये एक छोटी मुलगी तिच्या आईला मुकली आहे. 

ही घटना मुजफ्फरनगरच्या गंगानहर कॅनॉलमध्ये घडली आहे. शनिवारी 35 वर्षीय महिलेने तिच्या 5 वर्षांच्या मुलासह कॅनॉलमध्ये उडी मारली. मात्र, तिच्या मुलाला वाचविण्यात आले. या महिलेचा मृत्यू झाला. तपासामध्ये या महिलेचे माजी प्रियकरासोबतचे आक्षेपार्ह फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचे समोर आले होते. 

ज्याला फोन विकला त्यानेच फोटो व्हायरल केलेया महिलेचा माजी प्रियकर शुभम कुमार याने त्यांचे फोटो डिलीट न करताच मेरठच्याच अनूज प्रजापती याला मोबाईल विकला होता. प्रजापतीने हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. खतौलीचे पोलिस अधिकारी हरिशरण शर्मा यांनी सांगितले की, महिलेच्या आत्महत्येपूर्वी तपासामध्ये एक फोन केल्याचे समोर आले होते. हा कॉल तिने तिच्या पतीला केला होता. 

एक हत्या, एक आत्महत्याया घटनेआधीच शुभमला फोटो लीक झाल्याची खबर मिळाली होती. यामुळे त्याने मित्रांसोबत मिळून प्रजापतीचा खून केला. सोशल मिडीयावर व्हायरल झालेले फोटो पाहून या महिलेने शुभमला फोन केला होता. यामुळे संतापलेल्या शुभमने 23 मे रोजीच प्रजापतीला संपविले. सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावर सापडलेल्या मोबाईलमुळे पोलिसांनी आरोपींचा छडा लावला. फोटो व्हायरल होण्यासोबतच या खूनातही महिलेचे नाव आल्याने तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

एन्काऊंटरमेरठ पोलिसांनी शुभमचा आणि त्याच्या मित्रांचा तपास सुरु केला. मात्र, नाकाबंदीवेळी दोन मोटारसायकलवरून जाणाऱ्या 5 जणांना रोखायचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोघांच्या पायाला गोळ्या लागल्या. हे सर्वजन प्रजापतीच्या हत्येमध्ये पोलिसांना हवे होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी