शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: आज्जीचे कानातले ओढणाऱ्या चोरट्यांना नातीने दाखवला इंगा; पाहा जेव्हा तरूणी बनते 'सिंघम' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 18:38 IST

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक विद्यार्थिनी चोरी करून पळून जाणाऱ्या बदमाशांना भिडली.

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक विद्यार्थिनी चोरी करून पळून जाणाऱ्या बदमाशांना भिडली. खरं तर या धाडसी विद्यार्थीनीने चोरट्याची कॉलर पकडून त्यांना दुचाकीवरून खाली पाडले. मात्र, यानंतर चोरटे कानातले ओढून घेऊन पळून गेले. यादरम्यान वृद्ध महिला आणि तिची नात या दोघींनीही मदतीसाठी आरडाओरडा केला, मात्र कोणीही पुढे आले नाही. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेच्या सुमारे सहा तासांनंतर पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना चकमकीत अटक केली.

माहितीनुसार, ही घटना मेरठमधील लालकुर्ती भागातील आहे. शनिवारी सायंकाळी ८० वर्षीय वृद्ध महिला संतोष आपली नात रियासोबत बाजारात जात होती. याच दरम्यान बाईकस्वारांनी आजीबाईंचे सोन्याचे कानातले ओरबाडले नि चोरून पोबारा केला. अशातच रिया हिने चपळाई दाखवत कॉलर पकडून चोरट्याला दुचाकीवरून खाली ओढले. संतोष आणि रिया यांनी आरडाओरडा करत लोकांकडे मदत मागितली, पण कोणीच आले नाही. यानंतर चोरटे दुचाकीवरून पळून गेले. 

जेव्हा तरूणी बनते 'सिंघम' 
दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला. यानंतर, खबरदाराच्या माहितीवरून पोलिसांनी सुमारे सहा तासांनंतर रात्री उशिरा दोन्ही चोरट्यांना अटक केली. 

पोलिसांनी चोरट्यांना केली अटक 
या घटनेच्या संदर्भात, मेरठचे एसपी सिटी पीयूष सिंग यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी ५ वाजता लाल कुर्ती पोलीस स्टेशन परिसरातील मैदा परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन बदमाशांनी हे कृत्य केले. याचा व्हिडीओ मिळाला आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेत स्टेशन प्रभारी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"


 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशtheftचोरीPoliceपोलिसArrestअटक