शिक्षकांनो, सोशल मीडियावर पोस्ट पडेल महागात, सीबीएसईचा इशारा; १०वी, १२वीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांसाठी नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 09:39 IST2026-03-17T09:39:01+5:302026-03-17T09:39:54+5:30

 सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, काही परीक्षक सोशल मीडियावर मूल्यमापन प्रक्रियेबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पोस्ट करत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. 

Teachers, posting on social media will cost you dearly, CBSE warns; Guidelines for those checking answer sheets of 10th 12th | शिक्षकांनो, सोशल मीडियावर पोस्ट पडेल महागात, सीबीएसईचा इशारा; १०वी, १२वीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांसाठी नियमावली

शिक्षकांनो, सोशल मीडियावर पोस्ट पडेल महागात, सीबीएसईचा इशारा; १०वी, १२वीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांसाठी नियमावली

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या परीक्षकांसाठी कडक नियमावली जारी केली आहे. मूल्यमापन प्रक्रियेतील कोणतीही गोपनीय माहिती, अनुभव किंवा मते सोशल मीडियावर शेअर केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर आणि शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल, असा इशारा बोर्डाने सोमवारी दिला आहे.

 सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, काही परीक्षक सोशल मीडियावर मूल्यमापन प्रक्रियेबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पोस्ट करत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. 

अफवा पसरू शकतात 
शिक्षकांच्या पोस्टमुळे विद्यार्थी, पालक आणि इतर घटकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अफवा पसरण्याची शक्यता असते. सीबीएसईची उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रिया ही अत्यंत गोपनीय असून ती कठोर नियमांच्या अधीन आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याबद्दल भाष्य करणे हे व्यावसायिक आचरणाचे उल्लंघन मानले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अफवा पसरवण्याचे २० प्रकार उघड
सध्या सुरू असलेल्या सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या काळात चुकीची माहिती आणि अफवा पसरवण्याचे किमान २० प्रकार समोर आले असून, याप्रकरणी कडक पावले उचलण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत दिली.

अफवा पसरवणारे व्हिडिओ संबंधित सोशल मीडियावरून तातडीने हटवण्यात आले आहेत. बनावट बातम्या रोखण्यासाठी सीबीएसई बोर्ड 'सर्ट-इन' आणि सायबर गुन्हे समन्वय केंद्रासोबत सातत्याने संपर्कात असून सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकही तैनात करण्यात आले आहे.
 

Web Title : सीबीएसई की शिक्षकों को चेतावनी: सोशल मीडिया पोस्ट पड़ सकती है भारी!

Web Summary : सीबीएसई ने परीक्षकों को सोशल मीडिया पर गोपनीय मूल्यांकन विवरण साझा करने के खिलाफ चेतावनी दी है। उल्लंघन करने वालों पर कानूनी और अनुशासनात्मक कार्रवाई की जाएगी। झूठी जानकारी फैलने से भ्रम पैदा होता है। बोर्ड परीक्षाओं के दौरान अफवाहों को रोकने के लिए सोशल मीडिया पर निगरानी रख रहा है और भ्रामक सामग्री को हटा दिया है। गलत सूचना के बीस मामले सामने आए हैं।

Web Title : CBSE Warns Teachers: Social Media Posts Could Prove Costly!

Web Summary : CBSE warns examiners against sharing confidential evaluation details on social media. Violators face legal and disciplinary action. False information spreads, creating confusion. The board is monitoring social media to curb rumors during exams and has removed misleading content. Twenty instances of misinformation have been identified.