शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

एलपीजी गॅसच्या सुरक्षित वाहतुकीसाठी १२,५०० कोटींचा पाईपलाईन प्रकल्प, पेट्रोलियम-नैसर्गिक वायू नियामक मंडळाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 09:14 IST

LPG Gas: देशातील स्वयंपाकाच्या गॅसची वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) १२,५०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या पाईपलाईन विस्तार योजनेची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : देशातील स्वयंपाकाच्या गॅसची वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) १२,५०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या पाईपलाईन विस्तार योजनेची घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे रस्ते मार्गाने होणारी एलपीजीची धोकादायक वाहतूक कमी होऊन थेट पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करणे शक्य होणार आहे.

सध्या देशात एलपीजीची वाहतूक मोठ्या प्रमाणात गॅस टँकरद्वारे रस्ते मार्गाने केली जाते. हे टँकर अनेकदा अपघातांना निमंत्रण देतात. हा धोका टाळण्यासाठी सरकारने पाईपलाईन विस्तार योजना आखली आहे. या प्रकल्पांतर्गत देशात एकूण २५०० किलोमीटर लांबीच्या चार प्रमुख पाईपलाईन्स टाकल्या जाणार आहेत. 'शिक्रापूर-हुबळी-गोवा', 'चेरलापल्ली-नागपूर', 'पारादीप-रायपूर' आणि 'झाशी-सितारगंज' या मार्गांचा त्यात समावेश आहे.

या पाईपलाईन्स रिफायनरी आणि बंदरांना थेट बॉटलिंग प्रकल्पांशी जोडतील. प्राप्त माहितीनुसार, या चार प्रमुख पाईपलाईन्सच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

ऊर्जा सुरक्षेसाठी मोठे पाऊलसूत्रांनी सांगितले की, या नवीन पाईपलाईन्स केवळ वाहतुकीचा मार्ग नसून, संकटकाळात त्या गॅस साठवणुकीचे (स्टोरेज) केंद्र म्हणूनही काम करतील. यामुळे देशातील ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत होईल. "रस्ते वाहतुकीच्या तुलनेत पाईपलाईन हा अधिक विश्वासार्ह, स्वस्त आणि पर्यावरणास पूरक पर्याय आहे," असे मंडळाने म्हटले आहे. वाढत्या एलपीजी वापराच्या पार्श्वभूमीवर, रस्ते मार्गावरील ताण कमी करून सामान्यांना वेळेवर गॅस पुरवठा करणे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ₹12,500 Crore Pipeline Project for Safer LPG Transport Announced

Web Summary : To enhance LPG transport safety, the government invests ₹12,500 crore in pipeline expansion. This reduces reliance on dangerous road transport by connecting refineries and ports to bottling plants via 2500 km of pipelines. Tenders for Shikrapur-Hubli-Goa, Cherlapalli-Nagpur, Paradeep-Raipur, and Jhansi-Sitarganj routes are underway.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई