शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 11:37 IST

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या सख्ख्या काकीशी पोलीस ठाण्यात लग्न केलं.

उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या सख्ख्या काकीशी पोलीस ठाण्यात लग्न केलं. या घटनेनंतर काका म्हणाला की, "माझं सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे, मला लुटण्यात आलं. माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. हा माझा पुतण्या आहे. माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. पोलिसांवर दबाव आणण्यात आला आणि पोलिसांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात लग्न झालं. त्याने मर्जीने लग्न केलं आहे, जर त्यांचं काही झालं तर मला त्यात अडकवता कामा नये."

रामपूरच्या पटवाई पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका गावात ही घटना घडली. एका तरुणाचे त्याच्या काकीशी प्रेमसंबंध होते. पण काकाला याची अजिबात माहिती नव्हती, काही दिवसांनी लोकांना संशय आला. जेव्हा हे प्रेमसंबंध गावात चर्चेचा विषय बनले तेव्हा काकाला या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. त्यानंतर काकीनेही स्पष्टपणे ती आता त्याच्यासोबत राहणार नाही, तिला तिच्या पुतण्यासोबत राहायचं असल्याचं सांगितलं.

कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यानंतर काकी पटवाई पोलीस ठाण्यात गेली आणि पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याने तिच्याशी लग्न न केल्यास त्याला जेलमध्ये पाठवण्याची धमकीही दिली. त्यानंतर पोलिसांनी पुतण्याला पोलीस ठाण्यात बोलावलं. काकीने सर्वांसमोर लग्न केलं. पुतण्याला हार घातला. काकाला घटस्फोट न देता पुतण्याशी लग्न केलं आहे.

काका नूरपालला त्याची पत्नी चंचलच्या मनात काय चाललं आहे याची काहीच कल्पना नव्हती. काकी आणि पुतण्याचे तीन वर्षे प्रेमसंबंध चालू होते. शेजाऱ्यांनी ते पाहिलं पण ते गप्प राहिले. "मी आता तुमच्यासोबत राहणार नाही, पुतण्यासोबत राहणार आहे" हे ऐकून नूरपाल हताश झाला. माझं घर उद्ध्वस्त झालं आहे. माझी एकच विनंती आहे की, मला कोणत्याही प्रकरणात ओढलं जाऊ नये. मला फक्त जगायचं आहे असं नूरपालने म्हटलं आहे. सध्या गावात याच घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न