शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

राहुल गांधींनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, 'हे' प्रश्न विचारत केला हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 12:38 PM

चीनने गलवान खोऱ्या आपले सैन्य मागे घेण्याबाबत आणि चिनी पक्षाशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलेल्या चर्चेबाबत राहुल गांधींनी काही प्रश्न विचारले आहेत.

नवी दिल्ली: लडाखमध्ये दोन महिन्यांपासून निर्माण झालेला तणाव निवळला आहे. चिनी सैन्य गलवानमधून 2 किलोमीटर मागे गेलं आहे. चीन सरकारकडूनदेखील या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. पूर्व लडाखमधील अनेक पोस्टवरून चिनी सैन्यानं माघार घेतली असून भारतीय जवान परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून निर्माण झालेला तणाव कमी करण्यात सरकारला यश आल्याचं चित्र आहे. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. मात्र यावरून आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. 

चीनने गलवान खोऱ्या आपले सैन्य मागे घेण्याबाबत आणि चिनी पक्षाशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलेल्या चर्चेबाबत राहुल गांधींनी काही प्रश्न विचारले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी निशाणा साधला आहे. तसेच अजित डोवाल आणि चिनी स्टेट काऊंसिलर वांग यी यांच्या चर्चेसंदर्भात दोन्ही पक्षांकडून जारी केलेले निवेदन शेअर करत तीन प्रश्न विचारले आहेत. 

"राष्ट्रहीत हे सर्वोच्च आहे. त्याचे रक्षण करणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे. मग असं असताना...1. जैसे थे स्थितीबाबत दबाव का टाकण्यात आला नाही?2. चीन आमच्या भूभागात 20 निशस्त्र जवानाच्या हत्येला योग्य कसे काय ठरवत आहे?3. गलवान खोऱ्यातील आमच्या क्षेत्रीय सार्वभौमत्वाचा उल्लेख का केला गेला नाही?" असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

कोरोना व्हायरसवरून राहुल गांधी यांनी सोमवारी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून पंतप्रधानांवर हल्लाबोल केला होता. नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर करत भविष्यात हॉवर्डमध्ये जेव्हा अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा कोविड, नोटबंदी आणि जीएसटी या तीन गोष्टींचा उल्लेख असेल असं म्हटलं होतं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी मोदींना टोला लगावला. "हॉवर्डच्या बिजनेस स्कूलमध्ये भविष्यात  अपयशाच्या केस स्टडी म्हणून कोविड, नोटबंदी आणि जीएसटी या तीन गोष्टी शिकवल्या जातील" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : मुंबई, दिल्लीतून आनंदाची बातमी पण देशातील 'या' राज्यांनी वाढवली चिंता

कामासाठी काय पण! लग्न मंडपातच नवरीने घेतला लॅपटॉप अन्...; Video तुफान व्हायरल

Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! गुंड गोळीबार करत होते तरी पोलिसाने केला दीड किमीपर्यंत पाठलाग

India China Faceoff : मोदी सरकार चीनविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

CoronaVirus News : पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये 3 महिने पगार नसल्याने दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाAjit Dovalअजित डोवालIndiaभारत