CoronaVirus News : पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 03:34 PM2020-07-06T15:34:13+5:302020-07-06T15:55:26+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर पाळीव प्राण्यांपासून बाधा होत असल्याचे मेसेज व्हायरल होत होते. काही अफवा पसरल्या होत्या. यानंतर आता WHO ने माहिती दिली आहे.

जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात संशोधन सुरू असून संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे.

जगभरात प्राण्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दोन पाळीव मांजरांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली होती.

प्राण्यांना कोरोनाची लागण होते का?, पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होतो का? यासह असंख्य प्रश्न लोकांना पडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत महत्त्वाची मााहिती दिली आहे.

सोशल मीडियावर कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर पाळीव प्राण्यांपासून बाधा होत असल्याचे मेसेज व्हायरल होत होते. काही अफवा पसरल्या होत्या. यानंतर आता WHO ने माहिती दिली आहे.

पाळीव प्राण्यांपासून कोरोनाची लागण होण्याचा धोका अतिशय कमी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी काही प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र, पाळीव प्राण्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं आहे.

प्राण्यांमुळे माणसांना सर्वप्रथम कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अनेकांनी पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले होते.

पाळीव प्राण्यांबाबत असलेल्या अफवेबाबत जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

नागरिक बाहेर जाताना आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनाही सोबत घेऊन जातात. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास मनाई केली होती.

जगभरातील अनेक देश कोरोनाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 308,645 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 11,580,119 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 6,547,935 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.