शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:26 IST

PM Modi to Address Nation Today: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

PM Modi to Address Nation: पहलगाम दहशतवादी हल्ला, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेलं 'ऑपरेशन सिंदूर', त्यानंतर पाकिस्तानने केलेली आगळीक, त्यांना भारतीय लष्कराने दिलेला दणका आणि अखेर दोघांनी सहमतीने घेतलेला युद्धविरामाचा निर्णय, या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ अड्डे नष्ट करण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. परंतु अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन अण्वस्त्रधारी देश शस्त्रसंधीकडे वळले आहेत. पाकिस्तान नेहमी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आला आहे, परंतु भारत त्यास जशासतसे प्रत्यूत्तर देत आलाय. यानंतर आज पंतप्रधाननरेंद्र मोदी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, भारत-पाकिस्तान युद्धविरामाबद्दल ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

पाकिस्ताननं युद्धविरामाची विनंती केल्यानंतर भारतानं ती मान्य केली होती. परंतु, त्या रात्री पाकिस्तानने पुन्हा भारतावर हल्ला केला होता. रविवारी रात्री मात्र कोणताही आगळीक केली नाही. 

पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठका...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक मोठी बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि इतर अनेक अधिकारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होते. यानंतर मोदी यांनी एनएसए अजित डोवाल यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली.

सैन्यप्रमुखांचा पाकिस्तानला इशारापत्रकार परिषदेदरम्यान लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, आपल्याला हवाई संरक्षण कारवाईला समजून घेणं आवश्यक आहे. पाकिस्तानच्या पापाचा घडा भरला आहे. आम्ही आधीच पूर्ण तयारी केली होती आणि त्यानुसारच कारवाई केली. "आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणून आम्ही प्रथम दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं योग्य मानलं. पाकिस्ताननं ही लढाई स्वतःची बनवली, म्हणूनच त्यांना प्रत्युत्तर देणं आवश्यक होतं," असं एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरSocial Mediaसोशल मीडियाprime ministerपंतप्रधानIndiaभारत