तिहार तुरुंगाचे तुरुंग अधीक्षक दीपक शर्मा पुन्हा वादात, पिस्तूलासह डान्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 09:05 IST2024-08-10T09:04:03+5:302024-08-10T09:05:50+5:30

नवी दिल्ली : तिहार तुरुंगाचे तुरुंग अधीक्षक दीपक शर्मा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत ...

Police dance with pistol goes viral | तिहार तुरुंगाचे तुरुंग अधीक्षक दीपक शर्मा पुन्हा वादात, पिस्तूलासह डान्स व्हायरल

तिहार तुरुंगाचे तुरुंग अधीक्षक दीपक शर्मा पुन्हा वादात, पिस्तूलासह डान्स व्हायरल

नवी दिल्ली : तिहार तुरुंगाचे तुरुंग अधीक्षक दीपक शर्मा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ते चक्क पिस्तूल हातात घेत ‘नायक नहीं, खलनायक हू मैं’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

जेलर दीपक शर्मा गुरुवारी रात्री घोंडा येथील भाजप नगरसेविकेच्या पतीच्या वाढदिवसाच्या पार्टीत गेले होते. सीमापुरी पोलिस ठाण्याजवळ हा कार्यक्रम सुरू होता. यावेळी पार्टीत दीपक शर्मांनी हातात पिस्तूल घेत खलनायक गाण्यावर डान्स केला. दीपक शर्मा यापूर्वीही अनेकदा वादात सापडले आहेत. त्यांनी माझ्याकडून  बॉडी बिल्डिंगसाठी ३० लाख रुपये घेतल्याचा आरोप कैदी सुकेशने केला होता. त्यामुळे आता त्यांची नव्याने चौकशी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Police dance with pistol goes viral