स्वतःची छत्री स्वतःच पकडल्यानं मोदींचं कौतुक...! मनमोहन सिंग, राहुल गांधींचे जुने PHOTO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 07:01 PM2021-07-19T19:01:22+5:302021-07-19T19:04:34+5:30

हातात छत्री घेऊन भरपावसात पत्रकारांशी संवाद; या मोदींच्या नव्या अंदाजाचे सोशल मिडियावर जोरदार कौतुक होत आहे. पण याच बरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांचेही जुने फोटो सोशल मिडियावर आता व्हायरल झाले आहेत आणि त्यांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली जात आहे.

PM Modi's appreciation for holding his own umbrella and Old PHOTO of Manmohan Singh and Rahul Gandhi goes viral | स्वतःची छत्री स्वतःच पकडल्यानं मोदींचं कौतुक...! मनमोहन सिंग, राहुल गांधींचे जुने PHOTO व्हायरल

स्वतःची छत्री स्वतःच पकडल्यानं मोदींचं कौतुक...! मनमोहन सिंग, राहुल गांधींचे जुने PHOTO व्हायरल

googlenewsNext


नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशानाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, यावेळी पाऊस सुरू असल्याने मोदी स्वतःची छत्री स्वतःच घेऊन पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यांचे यावेळचे फोटो सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. हातात छत्री घेऊन भरपावसात पत्रकारांशी संवाद, या मोदींच्या नव्या अंदाजाचे सोशल मिडियावर जोरदार कौतुक होत आहे. पण याच बरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांचेही जुने फोटो सोशल मिडियावर आता व्हायरल झाले आहेत आणि त्यांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली जात आहे. (PM Modi's appreciation for holding his own umbrella and Old PHOTO of Manmohan Singh and Rahul Gandhi goes viral)

असं सुरू आहे मोदींचं कौतुक -
एका ट्विटर युझरने, "भारताचे 4 पंतप्रधान आणि छत्री" असे टायटल देत, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नावं लिहून फोटो पोस्ट केले आहे.

भाजपचे मध्य प्रदेशचे सह संगठन महामंत्री हितानंद शर्मा यांनी म्हटले आहे, "हे दोन्ही फोटो आजचे आहेत. फरक स्पष्ट आहे."

पंतप्रधान मोदी जी अभिमान वाटतो - 
पंतप्रधान मोदी जी आपला अभिमान वाटतो... जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी आपली छत्री स्वतःच पकडून ठेवली आहे आणि माध्यमांशी संवाद साधत आहेत. यातूनच त्यांचे व्यक्तीमत्व दिसते. यामुळेच तर आम्ही म्हणतो, कुणीही नरेंद्र मोदी होऊ शकत नाही. 

काही लोक मोदी आणि राहुल गांधी यांची अशीही तुलना करत आहेत -

दरम्यान, पंतप्रधान मोदी पत्रकारांशी संवाद साधत असताना काही मंत्रीही त्यांच्यासोबत होते. या अधिवेशनात मोदी सरकार कोण कोणती विधेयकं मंजूर करून घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तसेच, विरोधकही करोना व्यवस्थापन, महागाई, इंधन दरवाढ आणि कृषी विधेयकांच्या मुद्यांवर आक्रमक असण्याची शक्यता आहे. 

परखड प्रश्न विचारा, पण सरकारलाही उत्तर देण्याची संधी द्या - 
या सभागृहात चर्चा केली गेली पाहिजे. देशाच्या जनतेला उत्तरं हवी आहेत. ती उत्तरं देण्याची सरकारची तयारी आहे. मी सर्व खासदार आणि राजकीय पक्षांना विनंती करतो की त्यांनी परखड  प्रश्न विचारावेत, परंतु सरकारलाही शांत वातावरणात उत्तर देण्याची संधीही द्यावी, असही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
 

Web Title: PM Modi's appreciation for holding his own umbrella and Old PHOTO of Manmohan Singh and Rahul Gandhi goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.