शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 20:52 IST

Pahalgam Terrorist Attack : ओवेसी म्हणाले, "हा दहशतवादी हल्ला केलेल्या या कुत्र्यांना शिक्षा मिळणे आवश्यक आहे. खरे तर..."

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. देशवासीयांना दहशतवाद्यांचा समूळ नाश हवा आहे. दहशतवाद्यांचे असे हाल करणार, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधून आज केली. पाकिस्तानच्या सीमेवरील लक्ष अधिक वाढले आहे. पाकिस्ताननेही आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यांची लढाऊ विमाने रात्रभर आकाशात घिरट्या घालत होती. आता केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक होत आहे. या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. या बैठकीसाठी एआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनाही बोलावण्यात आले आहे. 

हैदराबाद येथे पत्रकार परिषदेत बोलताना लोकसभा खासदार ओवेसी म्हणाले, आपल्याला गृह मंत्रालयाकडून फोन आला होता. गृहमंत्री अमित शाह फोनवर होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीसाठी अमित शहा यांनी आपल्याला तातडीने दिल्लीला बोलावले आहे. ओवेसी पुढे म्हणाले, "हा दहशतवादी हल्ला केलेल्या या कुत्र्यांना शिक्षा मिळणे आवश्यक आहे. खरे तर, यांच्या वर बसलेले यांचे जे 'आका' आहेत, ज्यांना काश्मीर आणि भारतात नेहमीच अशांत रहावा असे वाटते. त्यांना मुळांपासून धडा शिकवण्याची गरज आहे."

ओवेसी म्हणाले, 'हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. मी सर्व पक्षांना यासाठी आमंत्रित करावे अशी मागणी केली होती. मी पत्रकार परिषद घेत असतानाच मला गृहमंत्र्यांचा फोन आला. 'ते म्हणाले- आपण कुठे आहात? मी म्हणालो- हैदराबादमध्ये. ते म्हणाले- उशीर होईल पण तुम्ही या.' जर मला तिकीट मिळाले तर... मला जे काही तिकीट मिळेल त्याने मी जाईन आणि सहभागी होईल." तसेच, दुसरीकडे, भारत सरकारने दिल्लीत तैनात असलेल्या परदेशी राजदूतांना परिस्थितीची माहिती देण्यासाठी बोलावले आहे.  माध्यमांतील वृत्तांनुसार, सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सर्व नेत्यांना घटनेची सविस्तर माहिती देतील. तसेच, पुढील रणनीती आणि कृतींवर नेत्यांचे मत देखील घेतले जाऊ शकते.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAmit Shahअमित शाहAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी