"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:32 IST2025-12-16T11:31:51+5:302025-12-16T11:32:56+5:30

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कानपूर येथील मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) चार्जशीट दाखल केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे

nia files chargesheet on Pahalgam Terror Attack kanpur youth Shubham Dwivedi wife aishanya says thank you | "१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी

"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कानपूर येथील मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) चार्जशीट दाखल केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे आणि आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलं की, भारत सरकार आणि NIA ने या प्रकरणात अत्यंत जलद गतीने कारवाई केली आहे, यासाठी त्या सर्व संबंधित अधिकारी आणि सशस्त्र दलांचे धन्यवाद.

ऐशान्या द्विवेदी म्हणाल्या की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी वेळेवर पूर्ण करून चार्जशीट दाखल करणं, हे पीडित कुटुंबांसाठी खूप मोठा दिलासा आहे. पहलगामच्या घटनेनंतर सरकारने सातत्याने कारवाई केली. भारत सरकार आणि NIA चे खूप-खूप धन्यवाद की या प्रकरणात लवकर चार्जशीट दाखल झाली. आपण ताबडतोब कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव चालवून दहशतवाद्यांना कठोर संदेश दिला. आता तपास प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या तपासामध्ये सामील असलेल्या सर्व अधिकारी आणि सशस्त्र दलांचे मी आभार मानते."

चार्जशीटमध्ये अशा लोकांची नावे समोर आल्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली, जे भारतीय असूनही दहशतवाद्यांना मदत करत होते. ऐशान्या म्हणाल्या की, अशा लोकांविरुद्ध कठोरत-कठोर कारवाई व्हायला हवी. ऐशान्या यांनी मागणी केली की, आरोपींना अशी शिक्षा मिळावी की, भविष्यात कोणताही भारतीय पाकिस्तान-समर्थित दहशतवाद्यांना मदत करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल आणि त्याचा आत्मा थरथरेल.

चार्जशीटमध्ये अशा लोकांची नावं देखील समाविष्ट आहेत, ज्यांच्यावर १० लाख रुपयांपर्यंतचं बक्षीस होतं. आता देशाने अशा प्रकरणांमध्ये शांत बसू नये, तर दहशतवादाविरुद्ध पूर्ण ताकदीने लढाई लढायला हवी. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये प्रत्येकाचा सहभाग असावा असंही म्हटलं आहे. ऐशान्या यांनी चिंता व्यक्त करताना सांगितलं की, पहलगाम हल्ल्यानंतर लाल किल्ल्याची घटना आणि नुकताच सिडनीत झालेला हल्ला देखील दहशतवादाचीच साखळी आहेत, जे दर्शवतात की, दहशतवादी कारवाया सतत वाढत आहेत. त्यांनी देशवासियांना एकत्र येण्याचे आवाहन केलं आणि म्हटलं की, दहशतवादाविरुद्धची लढाई केवळ सरकार किंवा तपास यंत्रणांची नाही, तर संपूर्ण देशाची आहे. यांच्याविरुद्ध संपूर्ण देशाला एकजूट व्हावं लागेल, तेव्हाच दहशतवाद समूळ नष्ट करता येईल.

Web Title : पहलगाम हमले की विधवा की मांग: आतंकवादियों की मदद करने से पहले डर लगे

Web Summary : पहलगाम हमले में मारे गए शुभम द्विवेदी की पत्नी ने एनआईए को चार्जशीट के लिए धन्यवाद दिया। उसने आतंकवादी समर्थकों के लिए कड़ी सजा की मांग की, ताकि भविष्य में मदद करने से रोका जा सके। उसने आतंकवाद के खिलाफ राष्ट्रीय एकता का आग्रह किया।

Web Title : Pahalgam Attack Widow Demands Harsh Punishment, Fear Before Aiding Terrorists

Web Summary : Widow of Kanpur's Shubham Dwivedi, killed in Pahalgam attack, thanks NIA for charge sheet. She seeks severe punishment for terrorist sympathizers, deterring future aid. She urges national unity against terrorism, viewing recent attacks as connected and a threat to the entire country.