शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी कशामुळे झाली? कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 09:31 IST

New Delhi Railway Station Stampede Reason: शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

New Delhi Railway Station Stampede: शनिवारी रात्री नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये ९ महिला, ४ पुरुष आणि ५ मुले आहेत. यापैकी सर्वाधिक ९ जण बिहारमधील, ८ दिल्लीतील आणि एक हरयाणातील आहेत. ही घटना रात्री १० वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर घडली. प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी हजारो भाविक स्टेशनवर जमले होते आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी ही घटना घडली, अचानक घडलेल्या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. पण, चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली. रेल्वेस्टेशनवर कोणी अफवा पसरवली होती का? याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा १८ वर, कशी घडली दुर्घटना?

 एलएनजेपी रुग्णालयाने मृत्यूंची पुष्टी केली आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, 14 जणांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू आहे. प्रयागराजकडे जाणाऱ्या दोन गाड्या लेट झाल्याने प्लॅटफॉर्मवरील गर्दी वाढली. 

यामुळे झाली चेंगराचेंगरी

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीचे नेमकी कशामुळे झाली याचे कारण अजूनही समोर आलेले नाही. दरम्यान आता याबाबतची एक माहिती समोर आली आहे. रेल्वे विभागाने एका विशेष ट्रेनची घोषणा केली होती. या घोषणेमुळे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी दावा केला जात आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीमुसार, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील गर्दी सतत वाढत होती. परिस्थिती अशी होती की एका तासात १५०० तिकिटे खरेदी केली जात होती. महाकुंभाला जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी होती. तर प्रयागराजला जाणाऱ्या दोन विशेष गाड्या उशिराने धावत होत्या. अशा परिस्थितीत, रेल्वेने आणखी एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वरून निघण्याची घोषणा केली. दुसरीकडे, इतर प्लॅटफॉर्मवर वाट पाहणाऱ्या लोकांनी विशेष ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर जाण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी ही चेंगराचेंगरी झाल्याचे समोर आले आहे.  

टॅग्स :New Delhi Railway Station Stampedeनवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरीrailwayरेल्वेKumbh Melaकुंभ मेळाDeathमृत्यूNew Delhiनवी दिल्लीdelhiदिल्ली