शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांना महापालिकेने बजावल्या नोटिसा टांगती तलवार : बेकायदा बांधकामांना संरक्षण

By admin | Updated: September 26, 2015 19:27 IST

डोंबिवली : बेकायदा बांधकामांचे संरक्षण केल्याप्रकरणी प्रशासनाने कल्याण डोंबिवली पालिकेतील चार नगरसेवकांना नगरसेवक पद रद्द करण्याच्या नोटिसा शुक्रवारी बजावल्या आहेत. यामध्ये शिवसेनेचे तीन व काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. शिवसेनेच्या एका नगरसेवकाला पद रद्द करण्याची नोटीस पाठविल्यानंतर शनिवारी प्रशासनाने उर्वरित चार नगरसेवकांना नोटिसा पाठवल्या. अश ाप्रकारे सर्व पक्षांमधील एकूण दहा नगरसेवकांचा पद रद्द करण्याच्या यादीत समावेश झाला आहे. काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे, शिवसेनेचे दोन नगरसेवक, अपक्ष शिवसेना समर्थक नगरसेवक विद्याधर भोईर यांना आयुक्त ई. रवींद्रन यांनी नोटीसा बजावल्याचे सांगण्यात आले. प्रभाग अधिकार्‍यांनी माहिती दिल्यानंतर कागदपत्रांची पड

डोंबिवली : बेकायदा बांधकामांचे संरक्षण केल्याप्रकरणी प्रशासनाने कल्याण डोंबिवली पालिकेतील चार नगरसेवकांना नगरसेवक पद रद्द करण्याच्या नोटिसा शुक्रवारी बजावल्या आहेत. यामध्ये शिवसेनेचे तीन व काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. शिवसेनेच्या एका नगरसेवकाला पद रद्द करण्याची नोटीस पाठविल्यानंतर शनिवारी प्रशासनाने उर्वरित चार नगरसेवकांना नोटिसा पाठवल्या. अश ाप्रकारे सर्व पक्षांमधील एकूण दहा नगरसेवकांचा पद रद्द करण्याच्या यादीत समावेश झाला आहे. काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे, शिवसेनेचे दोन नगरसेवक, अपक्ष शिवसेना समर्थक नगरसेवक विद्याधर भोईर यांना आयुक्त ई. रवींद्रन यांनी नोटीसा बजावल्याचे सांगण्यात आले. प्रभाग अधिकार्‍यांनी माहिती दिल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून आयुक्तांनी चार नगरसेवकांना पद रद्द करण्याच्या नोटिसा बजावून तीन दिवसात खुलासा करण्यास सांगितले आहे.
पोटे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका बांधकाम प्रकरणात यापूर्वी दिले आहेत. तर अनधिकृत बांधकामप्रकरणी लाच मागितल्या प्रकरणी भोईर याना रंगेहाथ पकडले होते. काही दिवस ते पोलीस कोठडीत होते. मात्र, पालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने त्यांची तत्कालीन आयुक्तांनी पदाधिकार्‍यांच्या मागणीवरून पाठराखण केली होती.
----------------
चौकट
काँग्रेससह भाजपा, मनसेचे नगरसेवक यांचा बेकायदा बांधकामांशी संबंध आहे का, यासंबंधीच्या कागदपत्रांची प्रशासन छाननी करीत आहे, असे पालिका अधिकार्‍यांनी सांगितले. गेल्या पंधरा वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात नगरसेवकांची बेकायदा बांधकामांवरून नगरसेवक पद रद्द करण्याची कारवाई प्रशासनाकडून पहिल्यांदाच करण्यात येत आहे.
---------------
कोट : नव्या कायद्यातील तरतुदीनुसार नोटीस बजाविण्याचे आदेश दिले आहेत, नेमक्या किती जणांना नोटीस दिल्या याबाबतची सविस्तर माहिती सोमवारी संबंधित नोडल ऑफीसर (वॉर्ड अधिकारी) देतील.
- संजय घरत, अतिरीक्त आयुक्त केडीएमसी
.............