शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ; जाणून घ्या आणखी काय-काय निर्णय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:52 IST

यासंदर्भात माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 10-11 वर्षांत खरीफ पिकांसाठीच्या MSP मध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी (२८ मे २०२५) झालेल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मोदी सरकारने शेतकऱ्यांनाही मोठे गिफ्ट दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी तांदळाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) ६९ रुपयांची वाढ करून, ती २,३६९ रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी २ लाख ७ हजार कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे.

मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट -यासंदर्भात माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 10-11 वर्षांत खरीफ पिकांसाठीच्या MSP मध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठीही किमान आधारभूत किमतीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. एकूण रक्कम सुमारे २,०७,००० कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. प्रत्येक पिकासाठी खर्चासह ५० टक्के रक्कम विचारात घेण्यात आली आहे."

शेतकऱ्यांना व्याजदरावर सवलत मिळत राहणार - केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी व्याज सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यासाठी १५,६४२ कोटी रुपये खर्च येईल. किसान क्रेडिट कार्ड (KCC) वर २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ४ टक्के व्याजदराने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. देशात ७.७५ कोटींहून अधिक किसान क्रेडिट कार्ड खाती आहेत. याचा आता लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल."

केंद्रीय मंत्रिमंडळाचे इतर निर्णय -याशिवाय, मध्य प्रदेशातील रतलाम ते नागदा दरम्यानचा रेल्वे मार्ग ४ लेन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याची लांबी ४१ किलोमीटर असेल. तसेच, महाराष्ट्रातील वर्धा रेल्वे मार्ग आणि तेलंगणामधील बल्लारशाह रेल्वे मार्ग ४ लेन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बडवेल-गोपावरम गाव (एनएच-६७) ते आंध्र प्रदेशातील गुरुविंदपुडी (एनएच-१६) पर्यंतचा ४-लेन बडवेल-नेल्लोर महामार्ग बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. या महामार्गाची लांबी १०८.१३४ किलोमीटर एवढी आहे, त्यासाठी ३६५३.१० कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीCropपीकBJPभाजपा