शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यावरून महाराष्ट्राची कानपिळी!

By admin | Updated: January 20, 2015 01:49 IST

राजकीय पातळीवर स्वच्छतेचे पोवाडे एकसुरात गायिले जात असतानाच, राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने कचरा व स्वच्छतेवरून महाराष्ट्राचे कान पिळले आहेत.

रघुनाथ पांडे - नवी दिल्लीराजकीय पातळीवर स्वच्छतेचे पोवाडे एकसुरात गायिले जात असतानाच, राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने कचरा व स्वच्छतेवरून महाराष्ट्राचे कान पिळले आहेत. वर्षभरापासून कचऱ्याचा आराखडा देण्यास टाळाटाळ चालविल्याने आता, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार याचा संपूर्ण अहवाल पंधरा दिवसांत द्या, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली म्हणून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्रासह गोवा, मध्यप्रदेश, राज्यस्थान, झारखंड आणि गुजरातलाही प्राधिकरणाने एकाच तराजूत मोजून तडाखा दिला असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतीत योजना सादर न केल्याने हे प्रगत राज्य असल्याने त्यानेही वर्षभरापासून या विषयाकडे डोळेझाक केल्याने प्राधिकरण चांगलेच संतापले आहे. देशातील कचऱ्याचे काय करायचे, यासाठी देशभरातील जेवढ्या याचिका सर्वौच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या, त्या एकत्रित करून सर्वौच्च न्यायालयाने राष्ट्रीय हरित प्राधिकारणाकडे पाठविल्या. प्राधिकरणाने वर्षभरापासून संबंधित राज्यांना कृतिबध्द आराखडा सादर करण्याचे सांगितले, यावर अनेकदा सुनावण्या झाल्या. मात्र विविध कारणांनी राज्ये आराखडा टाळतच गेले. गेल्या आठवड्यात न्या. स्वतंत्रकुमार यांनी राज्यांना तडक आदेश दिले असून, पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत राज्यांतील नगरविकास सचिव, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवांना हजर राहण्याचे सांगण्यात आले. पण सुनावणीआधी आठ दिवस कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी राज्याचा आराखडा पाठवायचा आहे. आराखडा दिला नाही अथवा संबंधित अधिकारी उपस्थित राहिले नाहीततर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून ५० हजार रूपये दंड केला जाईल व तो बेजबाबदार अधिकाऱ्याकडून वसुल केला जाणार आहे. कचरा व्यवस्थापनाची जागा, कालबध्द कार्ययोजना, योजनेचा संपूर्ण खर्च, शहरात केली जाणारी वृक्षलागवड व त्यासाठी येणारा खर्च तसेच कचऱ्यापासून वीज निर्मिती किती होणार या मुद्यांवर अहवाल सादर करायचा आहे.