शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

MahaKumbh 2025: प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन बंद, रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 08:35 IST

Mahakumbh Latest News: महाकुंभ सोहळ्यासाठी दिवसेंदिवस प्रयागराजमध्ये भाविकांची गर्दी वाढत असून, प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद करण्यात आल्याचे म्हटले जात होते. याबद्दलचे वृत्त केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी फेटाळून लावले आहे.  

Mahakumbh Marathi News: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरूच आहे. गर्दीमुळे रस्ते बंद झाले असून, वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. दरम्यान, प्रयागराजकडे येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढत असल्याने आता प्रयागराज संगम रेल्वे स्थानक पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले आहे.  तर प्रयागराज जंक्शन सुरू आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची माहिती दिली आहे.   

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पौर्णिमेच्या निमित्ताने महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. १२ फेब्रुवारी रोजी पौर्णिमा असून, ११ फेब्रुवारीपासून रेल्वे स्थानक बंद करणे अपेक्षित होते. पण, प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांच्या संख्या वाढल्याने १० फेब्रुवारीलाच प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

दारागंजनंतर प्रयागराजही बंद 

महाकुंभ सुरू असलेल्या ठिकाणापासून १ किमी अंतरावर प्रयागराज संगम रेल्वे स्थानक आहे. दारागंज आणि प्रयागराज हे दोन्ही वेगवेगळी स्थानके असून, दारागंज रेल्वे स्थानक आधीच बंद करण्यात आले आहे. आता प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे. 

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रयागराज जंक्शन स्थानकावरील वर्दळीचे फोटो शेअर केले आहेत. 'प्रयागराज जंक्शन व्यवस्थित सुरू आहे. जंक्शन बंद करण्यात आल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका', असे आवाहन रेल्वे मंत्र्यांनी केले आहे. 

 

१०-१५ तासांपासून भाविक अडकले वाहनांमध्ये

महाकुंभसाठी प्रयागराजकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. आतापर्यंत तीन अमृत स्नान झाले असून, यापुढे मर्यादित संख्येने भाविक येण्याची प्रशासनाचा अंदाज होता. पण, मागील तीन दिवसांत भाविकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनावर भार वाढला आहे. 

प्रयागराजमध्ये येणार सातही रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या २४ तासांपासून भाविकांच्या वाहनांचा ओघ वाढला असून, लोक १०-१५ तासांपासून वाहनांमध्ये अडकून पडले आहेत. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशTrafficवाहतूक कोंडीrailwayरेल्वे