शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Parliamentary Awards: मोदींच्या अनेक मंत्र्यांकडेच जन्मदाखला नाही; थरुर यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 17:38 IST

Lokmat Parliamentary Awards 2019 : नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन थरुर यांची मोदी सरकारवर जोरदार टीका

नवी दिल्ली: देशभरात गाजत असलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुनकाँग्रेस नेते शशी थरुर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात बोलताना थरुर यांनी लोकसभेत संमत झालेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावर भाष्य केलं. मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेकांना ते नेमके कुठले आहेत, हेच सिद्ध करता आलेलं नाही, अशी टीका करताना थरुर यांनी माजी लष्करप्रमुख आणि भाजपा नेते व्ही. के. सिंह यांचं नाव घेतलं. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन थरुर यांनी थेट मोदी सरकारवर शरसंधान साधलं. 'मोदींचे मंत्री असलेल्या सिंह यांनी एक याचिकादेखील दाखल केली आहे. जन्म दाखला आणि अधिकृत कागदपत्रांवरील जन्म तारीख वेगळी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्याकडे जुनी कागदपत्रं नीट जपून ठेवली जात नाहीत. देशातील अनेक भागांमध्ये ही समस्या भेडसावते. कित्येकांकडे जन्म दाखले नसतात,' असं थरुर म्हणाले.शशी थरुर यांनी यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शहांना जोरदार टोला लगावला. शहा कायम प्रत्येक समस्येसाठी काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरतात. अमित शहा प्रत्येक प्रश्नाला काँग्रेस आणि नेहरुंशी जोडतात. त्यामुळे त्यांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील, असा चिमटा त्यांनी काढला. धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन होऊ शकत नाही, पंडित नेहरु, बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद यांनीही असा विचार कधीही केला नाही. १९३५ मध्ये हिंदू महासभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली, तर १९४० मध्ये मुस्लीम लीगच्या जिना यांनी मुस्लिम राष्ट्राची संकल्पना मांडली. काँग्रेस पक्षानं कधीही धर्माच्या आधारावर राजकारण केलं नाही असं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकShashi Tharoorशशी थरूरAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेसBJPभाजपा